आशिया चषकात पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात सर्वांचे लक्ष विराट कोहलीच्या फॉर्मकडे लागले होते. या सामन्यात विराट ३५ धावांची खेळी केली. या संदर्भात भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने प्रतिक्रिया दिली आहे. ”विराट कोहलीने काढलेल्या ३५ धावा अतिशय महत्त्वाच्या असून तो फॉर्ममध्ये परत आल्याचे पाहून आनंद झाला” असे तो म्हणाला.

हेही वाचा – Viral Video: कॉन्फिडन्स असावा तर असा! विजयी षटकार मारण्याआधी पांड्याने केलं असं काही की…

”कोहलीने काढलेल्या ३५ धावा अतिशय महत्त्वाच्या होत्या. टी-२० मध्ये कोणताही संघ १४८ धावांचा लक्षाचा पाठलाग करत असतो, जर त्यांचे फलंदाज टिकून राहिले तर जिंकण्याची शक्यता जास्त असते. एकंदरीत काल भारताचा डाव बघितला तर, विराट कोहलीने काढलेल्या त्या ३५ धावा अतिशय महत्त्वाच्या होत्या”, असे तो म्हणाला. पुढे तो म्हणाला, ”कोहली महिन्याभराच्या ब्रेकनंतर मैदानात परतला आहे. तो एक मोठा खेळाडू आहे. त्यामुळे धावांचा पाठलाग करताना त्याच्याकडून ६० ते ७० धावांची अपेक्षा होती”

हेही वाचा – VIDEO: भारत-पाकिस्तान सामना सुरु होण्याआधी वसीम अक्रम यांचा संताप; मैदानावरच जाहीर केली नाराजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काल झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहने पहिल्याच षटकात कोहलीला बाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, फखर झमने त्याचा झेल सोडल्याने कोहलीला जीवनदान मिळाले. त्यानंतर कोहलीने संघाला सावरत तीन चौकार आणि एका षटकारासह ३५ धावांची खेळी केली. अखेर १० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर फिरकीपटू मोहम्मद नवाजच्या चेंडूवर तो झेलबाद झाला.