scorecardresearch

IND vs AUS 1st Test: टप्पा पडताच शमीचा चेंडू घुसला थेट स्टंपमध्ये, डेव्हिड वॉर्नरही झाला अवाक, पाहा VIDEO

IND vs AUS 1st Test Update: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात पहिल्या सामन्यात भारताने दमदार सुरुवात केली. मोहम्मद सिराजने उस्मान ख्वाजा बाद केले. त्याचबरोबर मोहम्मद शमीने डेव्हिड वार्नरला बोल्ड केले.

IND vs AUS 1st Test Update
मोहम्मद शमी आणि डेव्हिड वार्नर (फोटो-लोकसता ग्राफिक्स टीम)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून नागपुरात खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचवेळी भारतीय संघाने सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाने 3 षटकात 2 महत्त्वपूर्ण विकेट गमावल्या आहेत, ज्यामध्ये डेव्हिड वॉर्नरची विकेट उत्कृष्ट होती. त्याला मोहम्मद शम्मीने बाद बोल्ड केले.

भारतीय संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी सध्या धोकादायक फॉर्ममध्ये आहे. तो आपल्या वेगवान आणि स्विंगने चेंडून फलंजांना मात देत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातही त्याने असेच केले. पहिल्या षटकात त्याने डेव्हिड वॉर्नरला अचूनक मारा केला, तर दुसऱ्या षटकात येताच त्याने चेंडू आतील बाजूने स्विंग केला, जो वॉर्नरला चकवा देत चेंडू थेट स्टंपमध्ये घुसला. चेंडूचा वेग इतका जास्त होता की स्टंप हवेत कोलांट्या खात जमिनीवर पडली. यासह भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली आहे.

सामन्याबद्दल बोलायचे, तर ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात ३२ षटकानंतर २ बाद ७६ धावा केल्या आहेत. डेव्हिड वार्नर आणि उस्मान ख्वाजा प्रत्येकी १ धावांवर बाद झाल्याने ऑस्ट्रेलिया मोठा धक्का बसला आहे. भारताकडून मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी एक विकेट घेतली.

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील कसोटी आकडेवारी –

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना १९४७ मध्ये खेळला गेला होता. तेव्हापासून, दोन्ही संघांमध्ये २७ कसोटी मालिका खेळल्या गेल्या आहेत, त्यापैकी भारताने १० तर ऑस्ट्रेलियाने १२ मालिका जिंकल्या आहेत. याशिवाय दोघांमध्ये १०२ कसोटी सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी ३० भारताने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने ४३ सामने जिंकले आहेत. याशिवाय २८ सामने अनिर्णित राहिले आहेत. ऑस्ट्रेलियाने भारतात एकूण १४ कसोटी मालिका खेळल्या आहेत, त्यापैकी ८ भारताने तर ४ कांगारूंना जिंकल्या आहेत. याशिवाय २ मालिका अनिर्णित राहिल्या आहेत.

हेही वाचा – IND vs AUS 1st Test: रोहित शर्माकडे इतिहास रचण्याची सुवर्ण संधी; जर ‘हे’ काम केले, तर ठरणार जगातील पहिलाच कर्णधार

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रीकर भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), नॅथन लायन, टॉड मर्फी, स्कॉट बोलँड

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-02-2023 at 12:20 IST