Virat Kohli Reaction Viral After Losing Wicket : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने त्यांचा डाव सुरु केला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी केलेल्या धावसंख्येत आणखी १४२ धावांची वाढ करत उर्वरित ७ विकेट्स गमावले. मोहम्मद सिराजने भारतासाठी चमकदार कामगिरी केली. त्याने भेदक गोलंदाजी करून १०८ धावा करत ४ विकेट्स घेतल्या. शार्दूल ठाकूरने ८३ धावा देत २ विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमीनेही १२२ धाव देत दोन विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने १७४ चेंडूत १६३ धावा, तर स्टीव्ह स्मिथने २६८ चेंडूत १२१ धावांची शतकी खेळी केली. स्मिथने ३१ वा शतक ठोकला.

भारताने या धावांचा पाठलाग करताना ७१ धावांवर ४ विकेट्स गमावल्या होत्या. परंतु, अजिंक्य रहाणे नाबाद (२९) आणि रविचंद्रन आश्विनने पाचव्या विकेट्ससाठी ४८ धावा केल्या. त्यामुळे फलकावर ७१ धावांची आणखी वाढ झाली. जडेजा दिवसाच्या अंतिम टप्प्यात ऑफ स्पिनर नेथन लियॉनचा शिकार बनला. त्यानंतर श्रीकर भरत रहाणेसोबत ५ धावांवर नाबाद राहिला आहे.

नक्की वाचा – जीवदान मिळाल्यानंतरही फलंदाजाने तीच चूक केली अन् घडलं असं काही…पाकिस्तानी क्रिकेटरचा ‘तो’ मजेशीर Video झाला व्हायरल

भारताने टी ब्रेकआधी पहिल्या १० षटकात ३७ धावा फलकावर लागल्या असताना कर्णधार रोहित शर्मा (१५) आणि शुबमन गिल (१३) धावांवर बाद झाला. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने रोहित शर्माला बाद केलं. तर तर गिल स्कॉट बोलॅंडच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. भारताच्या पहिल्या इनिंगच्या १९ व्या षटकात मिचेल स्टार्कने अचूक टप्प्यावर चेंडू फेकला. चेंडूने उसळी घेतल्यानं विराट कोहलीने त्या चेंडूवर सावध खेळी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, चेंडू बॅटला लागून दुसऱ्या स्लिपच्या दिशेनं गेला आणि विराट झेलबाद झाला. त्यामुळे भारताला चौथा धक्का बसला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत भारताने १५१ धावांवर पाच विकेट्स गमावल्या होत्या. भारत अजूनही ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील धावसंख्येच्या ३१८ धावांनी मागे आहे. भारताला फॉलो ऑन टाळण्यासाठी अजूनही ११९ धावांची गरज आहे. ऑस्ट्रेलियाच्या विशाल धावसंख्येसमोर भारताची सुरुवात खराब झाली.