सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाने आपला पहिलावहिला विजय नोंदवला. अबुधाबीत रंगलेल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानला ६६ धावांनी नमवले. या विजयानंतर अनेकांनी टीम इंडियाला सेमीफायनलसाठी शुभेच्छा दिल्या. तर काहींनी हा सामना फिक्स असल्याचेही सोशल मीडियावर म्हटले. या चर्चानंतर एका ट्वीटचा फोटो व्हायरल झाला. या फोटोत अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने भारताला ”well paid india” असे म्हटल्याचे हे ट्वीट दिसले.

या फोटोनंतर नेटकऱ्यांनी सामन्यापबाबत तर्क-वितर्क लावण्यास सुरुवात केली. काहींनी मीम्सचा पाऊसही पाडला. पाहा नेटकऱयांनी केलेले मीम्स..

हेही वाचा – क्या बात..! टीम इंडियाचा हेड कोच बनल्यानंतर राहुल द्रविडची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “पुढील दोन वर्षात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असा रंगला सामना..

अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर रंगेलल्या टी-२० वर्ल्डकपच्या महत्त्वपूर्ण सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर ६६ धावांनी मात केली. या विजयासह भारताने स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवत चाहत्यांना दिवाळी गिफ्ट दिले. पहिले दोन सामने गमावलेल्या भारतीय संघाला आता उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी जर-तर या समीकरणावर अवलंबून राहावे लागणार आहे. पण जुन्या कामगिरीच्या कटू आठवणी बाजूला ठेवत विराटसेनेने अफगाणिस्तानची धुलाई केली. अफगाणिस्तानचा कप्तान मोहम्मद नबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची अर्धशतके, तर हार्दिक पंड्या-ऋषभ पंत यांनी काढलेल्या झटपट धावांमुळे भारताने अफगाणिस्तानसमोर २११ धावांचे आव्हान ठेवले. रोहित-राहुलने सलामीला येत १४० धावांची भागीदारी रचली. तर पंड्या-पंत यांनी शेवटच्या २१ चेंडूत तब्बल ६३ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी स्फोटक फटकेबाजी केली, पण भारताच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी विकेट घेतल्या. २० षटकात अफगाणिस्तानला ७ बाद १४४ धावांपर्यंतच पोहोचता आले. रोहित सामनावीर ठरला. या विजयासह भारताने आपल्या गुणांचे खाते उघडले. अफगाणिस्तानला मोठ्या फरकाने हरवल्याने भारताची धावगती धन (+०.०७३) झाली आहे.