Western Australia lose 8 wickets for just one run: ऑस्ट्रेलिया डोमेस्टिक वनडे चषक २-२४-२५ च्या १०व्या सामन्यात एक विचित्र घटना पाहायला मिळाली. पर्थमधील WACA स्टेडियमवर तस्मानियाविरुद्ध वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या ५३ धावांत सर्वबाद झाला. जोश इंग्लिस, कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट, ॲश्टन अगर आणि ॲरॉन हार्डी या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असलेल्या या संघाने १ धावातच ८ विकेट गमावले. बॅनक्रॉफ्ट बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या १५.४ षटकांत ५२ धावांत ३ विकेट्स अशी होती. यानंतर संघ २०.१ षटकात ५३ धावांवर बाद झाला.

वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे ६ फलंदाज खाते न उघडताच बाद झाले आणि लान्स मॉरिसने एकाही चेंडूचा सामना केला नाही आणि तो नाबाद राहिला. केवळ डार्सी शॉर्टने २२ धावा आणि कॅमेरॉन ब्रेनक्रॉफ्टने १४ धावा करत दुहेरी आकडा पार करता केला. ॲरॉन हार्डीने ७ आणि जोश इंग्लिसने १ धावा केल्या. तस्मानियाकडून ब्यू वेबस्टरने ६ विकेट घेतले.

हेही वाचा – IND vs NZ: मला काय माहित त्याला हिंदी येते…”, पंत आणि वॉशिंग्टन सुंदरची योजना फसली; VIDEO मध्ये पाहा काय घडलं?

तस्मानियाने ८.३ षटकात ३ गडी गमावून ५५ धावा करत सामना जिंकला. मिचेल ओवेन २९ आणि मॅथ्यू वेड २१ धावा करून नाबाद परतले. कॅलेब ज्वेल ३ धावा तर जेक वेदरल्ड खाते न उघडता नाबाद राहिला. जॉर्डन सिल्क १ धावा करून बाद झाला. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून जोएल पॅरिसने २ आणि लान्स मॉरिसने १ विकेट मिळवली.

हेही वाचा – बाळाच्या जन्माची माहिती मिळताच सामना अर्धवट सोडून गेला क्रिकेटपटू अन् मग…, क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडला असा अनोखा प्रसंग

लिस्ट ए मधील सर्वात कमी धावसंख्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावसंख्या वेस्ट इंडिजच्या अंडर-१९ संघाच्या नावावर आहे. २००७ मध्ये बार्बाडोसविरुद्ध १८ धावा करून संघ बाद झाला होता. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात ओमानचा संघ २०१९ मध्ये स्कॉटलंडविरुद्ध २४ धावांत बाद झाला होता. झिम्बाब्वे संघ २००४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध ३५ धावांवर सर्वबाद झाला होता. वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाची किमान धावसंख्या ७० आहे. तर भारताचा किमान स्कोर ५४ आहे.