Duleep Trophy Full Schedule: देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील महत्वाच्या स्पर्धांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुलीप ट्रॉफी २०२५ स्पर्धेला येत्या २८ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत इस्ट झोन, नॉर्थ झोन, सेंट्रल झोन आणि नॉर्थ- इस्ट झोन या संघांचा समावेश असणार आहे. साऊथ झोन आणि वेस्ट झोन या दोन्ही संघांनी थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. कारण २०२३ मध्ये या दोन्ही संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला होता. दरम्यान कसं असेल या स्पर्धेचं संपूर्ण स्वरूप? जाणून घ्या.
यावेळी अनेक स्टार खेळाडू दुलीप ट्रॉफी स्पर्धा खेळताना दिसणार आहेत. वेस्ट झोन संघाकडून शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वालसारखे खेळाडू खेळताना दिसणार आहेत. तर साऊथ झोनकडून देवदत्त पडिक्कल,तिलक वर्मा आणि साई किशोरसारखे युवा खेळाडू खेळताना दिसणार आहेत. इशान किशन, मोहम्मद शमी आणि रियान पराग हे इस्ट झोनकडून खेळताना दिसणार आहेत.
या स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक
पहिला क्वार्टरफायनलचा सामना- इस्ट झोन विरूद्ध नॉर्थ झोन, २८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५, बीसीसीआय सेंटर ऑफ एक्लीलेंस ग्राऊंड, बंगळुरू
दुसरा क्वार्टर फायनलचा सामना – सेंट्रल झोन विरूद्ध नॉर्थ इस्ट झोन, २८ ते ३१ ऑगस्ट २०२५, बीसीसीआय सेंटर ऑफ एक्लीलेंस ग्राऊंड, बंगळुरू
पहिला सेमीफायनलचा सामना- साऊथ झोन विरूद्ध (संघ ठरलेला नाही), ४ ते ७ सप्टेंबर, २०२५, बीसीसीआय सेंटर ऑफ एक्लीलेंस ग्राऊंड, बंगळुरू
दुसरा सेमीफायनलचा सामना- वेस्ट झोन विरूद्ध (संघ ठरलेला नाही), ४ ते ७ सप्टेंबर, २०२५ , बीसीसीआय सेंटर ऑफ एक्लीलेंस ग्राऊंड, बंगळुरू
फायनल- संघ ठरलेले नाहीत, ११ ते १५ सप्टेंबर, २०२५, बीसीसीआय सेंटर ऑफ एक्लीलेंस ग्राऊंड, बंगळुरू.
साऊथ झोन: एन जगदीसन, तिलक वर्मा (कर्णधार), मोहम्मद अझहरुद्दीन (उपकर्णधार), त्रिपुराना विजय, आर साई किशोर, तनय त्यागराजन, विजयकुमार वैशाक, निधिश एमडी, रिकी भुई, बासिल एनपी, गुरजापनीत सिंह, स्नेहल कोंथकर, तन्मय अग्रवाल, देवदत्त पडिक्कल, मोहित काले, सलमान निजारय.
इस्ट झोन: संदीप पटनायक, विराट सिंह, इशान किशन (कर्णधार), अभिमन्यु ईश्वरन (उपकर्णधार) डेनिश दास, श्रीदाम पॉल, शरणदीप सिंह, कुमार कुशाग्र, रियान पराग, उत्कर्ष सिंह, मनीषी, सूरज सिंधु जैस्वाल, मुकेश कुमार, आकाश दीप, मोहम्मद शमी.
वेस्ट झोन: यशस्वी जैस्वाल, आर्या देसाई, हार्विक देसाई (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकुर (कर्णधार), सरफराज खान, ऋतुराज गायकवाड, जयमीत पटेल, मनन हिंगराजिया, सौरभ नवाले (यष्टीरक्षक),शम्स मुलानी, तनुश कोटियन, धर्मंद्रसिंह जडेजा, तुषार देशपांडे, अर्जन नागवासवाला.
नॉर्थ झोन: शुभम खजूरीया, शुभमन गिल (कर्णधार), अंकित कुमार (उपकर्णधार), आयुष बदोनी, यश धुल, अंकित कलसी, निशांत संधू, साहिल लोत्रा, मयंक डागर, युद्धवीर सिंह चरक, अर्शदीप सिंह, हर्षित राणा, अंशुल कम्बोज, ओकिब नबी, कन्हेय्या वधावन.
सेंट्रल झोन: आर्यन जुयाल, दानिश मालेवार, संजीत देसाई, ध्रुव जुरेल (कर्मधार, यष्टीरक्षक), रजत पाटीदार, कुलदीप यादव, आदित्य ठाकरे, दीपक चाहर, सारांश जैन, आयुष पांडे, शुभम शर्मा, यश राठौड, हर्ष दुबे, मानव सुतार, खलील अहमद.
नॉर्थ- इस्ट झोन: जेहू अँडरसन, आर्यन बोरा, तेची डोरिया, रोंगसेन जोनाथन (कर्णधार), अंकुर मलिक, आशीष थापा, सेडेझाली रुपेरो, कर्णजीत युमनाम, हेम छेत्री, पलजोर तमांग, अर्पित सुभाष भटेवरा (यष्टीरक्षक), आकाश चौधरी, बिश्वोरजीत कोंथोजाम, फेइरोइजाम जोतिन, अजय लामाबाम सिंह.
हे सामने लाईव्ह कुठे पाहता येणार?
दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील सर्व सामने जियो हॉटस्टार एॅपवर लाईव्ह पाहता येतील. हे सामने भारतीय वेळेनुसार सकाळी ९:३० वाजता सुरू होतील. हे सर्व सामने बंगळुरूतील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सीलेंस या मैदानावर खेळवले जाणार आहेत.