Rohit Sharma’s reaction to World Cup preparations: सध्या भारतीय संघ आगामी आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या तयारीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करत आहे. याच कारणामुळे वेस्ट इंडिज दौऱ्यावर मर्यादित षटकांच्या मालिकेतही अनेक प्रयोग पाहायला मिळाले. त्याचबरोबर युवा खेळाडूंना टी-२० मालिकेतही संधी दिली जात आहे. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्याच्या निर्णयाबाबत विचारले असता, त्याच्या उत्तराने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान रोहित शर्माला विश्वचषकच्या तयारीबाबत प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा त्यानेही सर्वांची उत्तरे दिली. यादरम्यान त्याला विराट कोहलीला टी-२० मध्ये विश्रांती देण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा हिटमॅन रोहित शर्माने सर्वांना चकीत करणारे उत्तर दिले.

विराट कोहलीबद्दल रोहित काय म्हणाला?

रोहित शर्माला विराट कोहली अलीकडच्या काळात टी-२० मालिका खेळत नसल्याबद्दल विचारण्यात आलं होतं. याला प्रत्युत्तर देताना रोहित शर्मा म्हणाला की, “हे वर्ल्ड कपचे वर्ष आहे. आम्हाला सर्वांना फ्रेश ठेवायचे आहे. यापूर्वीही अनेक दुखापती झाल्या आहेत. विराट आणि माझ्यावर फोकस आहे, हे मला समजतं, पण जडेजाही खेळत नाही, तुम्ही त्याच्याबद्दल विचारलं नाही?”

हेही वाचा – Team India : बीसीसीआयचा मोठा निर्णय! महिला सामन्यांच्या मीडिया राइट्सबाबत उचलले ‘हे’ पाऊल

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पुढे म्हणाला की, “मागच्या वर्षीही आम्ही असेच केले होते. तो टी-२० विश्वचषक होता. त्यामुळे आम्ही एकदिवसीय क्रिकेट खेळलो नाही. आताही आम्ही तेच करत आहोत, एकदिवसीय विश्वचषक आहे म्हणून आम्ही टी-२० खेळत नाही. सर्व काही खेळून तुम्ही विश्वचषकाची तयारी करू शकत नाही. दोन वर्षांपूर्वी आम्ही हा निर्णय घेतला आहे.”

हेही वाचा – Cristiano Ronaldo: सलग तिसऱ्या वर्षी ख्रिस्तियानो रोनाल्डो ठरला इन्स्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणारा व्यक्ती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रन-मशीन विराट आणि हिटमॅन रोहितने २०२२ च्या विश्वचषकातील इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीपासून भारतासाठी एकही टी-२० सामना खेळलेला नाही. आगामी विश्वचषक स्पर्धेत भारताचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी त्याचा संघ उत्सुक असल्याचे ३६ वर्षीय खेळाडूने कबूल केले. भारताने शेवटचे २०१३ मध्ये आयसीसीचे विजेतेपद पटकावले होते. २०११ मध्ये आशियाई दिग्गजांनी ५० षटकांच्या स्पर्धेचे शेवटचे आयोजन केले, तेव्हा भारताला विश्वविजेतेपदाचा चषक पटकावला होता.