Rahul Dravid, Rajasthan Royals: आयपीएल २०२५ स्पर्धेआधी राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार संजू सॅमसन संघाची साथ सोडणार अशी चर्चा Why rahul dravid stepped down as head coach of rajsthan royals know the reasons amd-2000रंगली असताना मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राहुल द्रविड यांनी मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती.

हा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानी होता. दरम्यान राहुल द्रविड यांनी मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा का दिला, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाही. राजस्थानकडून राहुल द्रविड यांना मोठ्या पदासाठी ऑफर देण्यात आली होती, मात्र ही ऑफर त्यांनी नम्रपणे नाकारल्याचं राजस्थान रॉयल्सने आधीच स्पष्ट केलं आहे. मात्र राजस्थानच्या ताफ्यात गटबाजी सुरू असल्याने राहुल द्रविड यांनी हा निर्णय घेतला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे.

काय आहेत नेमकी कारणं?

राजस्थान रॉयल्स संघात ३ गट पडल्याची चर्चा सुरू आहे. पहिल्या गटाला असं वाटतं की, रियान परागने राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार व्हावं. २०२५ मध्ये संजू सॅमसन दुखापतग्रस्त असताना रियान पराग संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. संजू सॅमसन इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळत होता. पण रियानला आपली छाप सोडता आली नव्हती.

तर या संघात आणखी एक गट आहे ज्यांना वाटतं, यशस्वी जैस्वालने संघाचा कर्णधार व्हावं. जैस्वाल २०२० पासून या संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. २३ वर्षीय यशस्वी जैस्वाल फलंदाजीत सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करता त्याला संघाचं कर्णधारपद देण्यात यावं, असं या गटातील सदस्यांना वाटत आहे.

तर आणखी एक गट आहे ज्यांना असं वाटतं की, संजू सॅमसन हाच कर्णधार म्हणून कायम रहावा. संजू सॅमसन या संघाची साथ सोडून चेन्नईत जाणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. संजू सॅमसन गेल्या कित्येक वर्षांपासून या संघाकडून खेळत आहे. माध्यमातील वृत्तानुसार, फ्रेंचायजीने घेतलेले निर्णय राहुल द्रविड यांना पटत नव्हते, त्यामुळे त्यांनी हे पद सोडलं असावं असं म्हटलं जात आहे.