Ravi Shastri on Team India: गेल्या १० वर्षात कर्णधार कोणीही असला पण त्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ एकही आयसीसी ट्रॉफी जिंकू शकला नाही. मोठ्या सामन्यांमध्ये खासकरून आयसीसी मालिकांमध्ये टीम इंडियाच्या पराभवाची मालिका इतकी वाढली आहे की आता चाहते आणि अनेक क्रिकेट तज्ज्ञही या संघाला चोकर्स म्हणू लागले आहेत. नुकत्याच खेळल्या गेलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर हा टॅग खूप चर्चेचा विषय बनला आहे. यावर भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींनी मोठे विधान केले.

अर्थात, यावेळी बहुतेक लोक टीम इंडियाला चोकर म्हणत आहेत, परंतु भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हा टॅग स्वीकारायला तयार नाहीत. याबाबत विचारले असता त्यांनी असे म्हणणाऱ्या सर्व टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले. नुकत्याच झालेल्या ‘द-विक’च्या संभाषणात शास्त्री यांनी निदर्शनास आणून दिले की, “भारताने गेल्या काही वर्षांत कदाचित आयसीसी ट्रॉफी जिंकल्या नसतील पण त्यासाठी कुणा एकट्या खेळाडूला दोष देता येणार नाही.”

A 19-year-old girl, Ayesha Rashid
…फिर भी दिल है हिंदुस्तानी! पाकिस्तानमधील १९ वर्षीय आयेशावर भारतात यशस्वी हृदयरोपण शस्त्रक्रिया!
miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
Real Reason Behind MSD's Early Test Retirement
VIDEO : ‘जर तुला मूल हवे असेल तर …’, साक्षीने धोनीच्या कसोटी क्रिकेटमधून लवकर निवृत्तीचे खरे कारण सांगितले
ravi shastri
संवादातील स्पष्टता महत्त्वाची- शास्त्री

हेही वाचा: Sunil Gavaskar: “तुम्ही कितीही मालिका गमावल्या तरी…” रोहितवर जबाबदारी निश्चित केली नाही? गावसकरांचा BCCIला संतप्त सवाल

‘द वीक’ला दिलेल्या मुलाखतीत प्रसिद्ध समालोचक शास्त्री पुढे म्हणाले, “मी असे म्हणणार नाही की भारतीय संघ चोकर्स आहे. म्हणजे हे दोन संघ जे खेळत होते (भारत आणि ऑस्ट्रेलिया) तेच दोन संघ होते ज्यांना तिन्ही विश्वचषक जिंकण्याची संधी होती आणि त्यांनी तसे केले नाही. आम्ही (आयसीसी वर्ल्ड कपमध्ये) मागे पडलो आहोत. आम्ही उपांत्य फेरी, अंतिम फेरीत आलो आहोत पण आमच्या हाताला ट्रॉफी लागली नाही. ट्रॉफी आम्ही जिंकू शकलो नाही कारण जेव्हा तुम्हाला मोठा विजय मिळवायचा असेल तेव्हा तुम्हाला एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. तुम्ही संघातील एका व्यक्ती जीवावर सामना जिंकू शकत नाहीत त्यामुळे कर्णधाराला दोष देता येणार नाही.”

हेही वाचा: IND vs PAK: भारतापुढे पाकिस्तान माघार! BCCI अन् ICCने पीसीबीची केली कोंडी, वर्ल्डकप वेळापत्रकावर शिक्कामोर्तब

याच विषयावर पुढे शास्त्री म्हणाले की, “डब्ल्यूटीसी फायनलमध्ये भारताचा पराभव झाला कारण एकाही फलंदाजाने मोठी खेळी केली नाही. वर्ल्डकप, टी२० वर्ल्डकप, चॅम्पियन ट्रॉफी, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप यांसारख्या मोठ्या फायनलमध्ये तुम्हाला शतक हवे असते. मगच तुमच्याकडे असणारे गोलंदाज सामना जिंकून देऊ शकतात किंवा तशाप्रकारची संधी निर्माण करतात. जर तुम्ही शतक झळकावले नाही तर तुम्हाला किमान तीन ५० धावांची भागीदारी आवश्यक आहे, मग ते कसोटी, टी२० किंवा वनडे क्रिकेट असो. जर तुम्ही ते केले नसेल तर तुम्ही जिंकण्यास पात्र नाही. तुम्हाला धावफलकावर धावसंख्या असणे आवश्यक आहे.”