Anurag Thakur on India vs Pakistan Bilateral Cricket: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय क्रिकेट संबंध बऱ्याच काळापासून बिघडले आहेत. गेल्या दहा वर्षांत या दोघांमध्ये एकही द्विपक्षीय मालिका आयोजित झालेली नाही. भारत आणि पाकिस्तान यांनी शेवटची मालिका २०१३मध्ये एकमेकांविरुद्ध खेळली होती. अलीकडेच आशिया कप २०२३मध्ये भारत आणि पाकिस्तान दोनदा आमनेसामने आले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक कर्नल, एक मेजर आणि पोलीस उपअधीक्षक शहीद झाल्यानंतर पाकिस्तानसोबत क्रिकेट अजिबात खेळू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीदरम्यान भारताचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

“पाकिस्तान जोपर्यंत सीमेपलीकडून होणारा दहशतवाद आणि भारतात घुसखोरी थांबवत नाही तोपर्यंत त्याच्यासोबत कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळली जाणार नाही, असा निर्णय बीसीसीआयने फार पूर्वीच घेतला होता,” असे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सूचक विधान केले. सध्या, भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामने फक्त ICC टूर्नामेंटमध्येच होतात. याशिवाय या दोघांमध्ये बऱ्याच काळापासून कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाही.

Morne Morkel Unhappy on Hardik Pandya Bowling
IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या T20I मालिकेपूर्वी गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्केल हार्दिकवर नाराज? जाणून घ्या कारण
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Babar Azam Resigns as Pakistan White ball team Captain by Social Media Post PCB
Babar Azam: “आता वेळ आली आहे की…,” बाबर आझमने मध्यरात्री अचानक कर्णधारपदाचा दिला राजीनामा, वर्षभरात दुसऱ्यांदा सोडली कॅप्टन्सी
Defence Minister Rajnath Singh
“…तर भारताने पाकिस्तानला आयएमएफपेक्षा जास्त पैसा दिला असता”; राजनाथ सिंह यांचे विधान चर्चेत!
Prime Minister Narendra Modi met gold medal winners in Chess Olympiad sport news
पंतप्रधानांची सुवर्णवीरांशी भेट
Australian captain Pat Cummins statement regarding Rishabh Pant
पंतला रोखणे आवश्यक -कमिन्स
IND vs BAN Basit Ali Slams PCB After India beat Bangladesh in Chennai Test
IND vs BAN : “वो जाहिल लोग है, उनको…”, भारताच्या विजयानंतर बासित अलीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला फटकारले
Sri lanka president taking oath
श्रीलंकेच्या नव्या अध्यक्षांचे भारतविरोधी विचार? भारत-श्रीलंकेच्या संबंधांवर परिणाम होणार?

हेही वाचा: Aakash Chopra: “विराट कोहलीला संघातून वगळणे हे…”, आकाश चोप्राने टीम इंडियाला दिला आश्चर्यचकीत करणारा सल्ला

क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी शुक्रवारी सांगितले की, “जोपर्यंत खेळांचा संबंध आहे, बीसीसीआयने फार पूर्वीच ठरवले होते की पाकिस्तान जोपर्यंत घुसखोरी आणि सीमापार दहशतवाद थांबवत नाही तोपर्यंत द्विपक्षीय सामने होणार नाहीत. मला वाटते हीच देशातील प्रत्येक सामान्य नागरिकाची भावना आहे. यावर मी अधिक बोलू इच्छित नाही.”

आशिया चषक २०२३हे संपूर्णपणे पाकिस्तानमध्ये होणार होते, परंतु बीसीसीआयने सांगितले की भारत सरकारच्या परवानगीअभावी ते आपला संघ पाठवू शकत नाहीत. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकावर बहिष्कार घालण्याची धमकी दिली. मात्र, आशियाई क्रिकेट परिषदेने हायब्रीड मॉडेलनुसार आशियाई चषक आयोजित केले आणि काही सामने पाकिस्तानमध्ये खेळले गेले तर उर्वरित श्रीलंकेत होत आहेत.

हेही वाचा: IND vs BAN, Asia Cup: रोहित शर्मा नेपाळ विरुद्धची मॅच विसरला? हिटमॅन म्हणतोय, “या सीरिज मध्ये चेस…”

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सध्या श्रीलंकेत आशिया कप खेळत आहे. भारताने अंतिम फेरी गाठली आहे. त्याचबरोबर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील गट टप्प्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. यानंतर सुपर-४च्या लढतीत भारताने पाकिस्तानचा २२८ धावांनी पराभव केला. आशिया चषकाचे अधिकृत यजमानपद पाकिस्तानकडे आहे हे विशेष. भारताने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला, त्यानंतर आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) संकरित मॉडेल स्वीकारले आणि श्रीलंकेला सह-यजमान बनवण्यात आले. पाकिस्तानमध्ये चार सामने आयोजित करण्यात आले होते, तर अंतिम सामन्यासह श्रीलंकेत ९ सामने आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.