India vs Pakistan 2025: आशिया चषक २०२५ स्पर्धेला येत्या ९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना हाँगकाँग आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ युएईमध्ये रोमांचक सामना रंगणार आहे. दरम्यान १४ सप्टेंबर भारत आणि पाकिस्ताचा सामना होणार आहे. दरम्यान या सामन्याआधी बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघांपैकी एक आहे. त्यामुळे जेव्हा दोन्ही संघ आमनेसामने येतात, त्यावेळी हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळत असतो. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय संघ पाकिस्तानचाविरुद्ध खेळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला गेला होता. पण अखेर दोन्ही संघ आमनेसामने येतील. दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये समोरासमोर येतील. पण कुठल्याही द्विपक्षीय मालिका खेळू शकणार नसल्याचं, सरकारने सांगितलं.

बीसीसीआयच्या सचिवांनी सांगितलं की, “बोर्डाकडून सरकारने घेतलेल्या निर्णयाचे पालन केले जाईल आणि भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळणार.” तसेच बीसीसीआय सचिव पुढे म्हणाले की, ज्या देशासोबत आमचे राजकीय संबंध चांगले नसतील त्या देशासोबत आम्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळू शकतो. पण द्विपक्षीय मालिका खेळणार नाही.

आधी म्हटलं जात होतं की, भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळण्यास नकार देऊ शकतो. पण या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे की, भारतीय संघ पाकिस्तानचा सामना करेल. याआधी लेजेंड्स लीग स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार दिला होता. सेमीफायनलच्या सामन्यातून माघार घेतल्यामुळे पाकिस्तानला अंतिम फेरीत स्थान मिळालं होतं.

आशिया चषक २०२५ साठी भारताचा संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हर्षित सिंह राणा, रिंकू सिंह

राखीव खेळाडू
प्रसिध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल, रियान पराग