लंडन : गतविजेत्या कार्लोस अल्कराझने प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील आपल्या मोहिमेस सोमवारी यशस्वी सुरुवात केली. पहिल्या फेरीच्या लढतीत अल्कराझने पात्रता फेरीतून आलेल्या मार्क लजालचा ७-६ (७-३), ७-५, ६-२ असा पराभव केला.अल्कराझचा विजय सरळ सेटमध्ये दिसत असला, तरी पहिल्या दोन सेटमध्ये लाजलने निश्चितपणे आव्हान उभे केले होते. जागतिक क्रमवारीत २६९व्या स्थानावर असलेल्या लाजलच्या प्रतिकारामुळे अल्कराझही चकित झाला होता. ‘‘त्याच्या खेळाने मी आश्चर्यचकित झालो,’’ अशी प्रतिक्रिया अल्कराझने व्यक्त केली.

महिला एकेरीत नवव्या मानांकित मारिया सक्कारीने विजयी सुरुवात करताना मॅकॅर्टनी केसलरला ६-३, ६-१ असे सहज पराभूत केले. फ्रेंच खुल्या स्पर्धेची उपविजेती जॅस्मिन पाओलिनीने चौथ्या प्रयत्नात विम्बल्डनची पहिली फेरी पार केली. तिने सारा सोरिबेस टोर्मोचाचा ७-५, ६-३ असा पराभव केला.पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत डॅनिल मेदवेदेवने अॅलेक्झांडर कोवासेविचचा ६-३, ६-४, ६-२, कॅस्पर रूडने अॅलेक्स बोल्टचा ७-६ (७-२), ६-४, ६-४, डेनिस शापावालोवने निकोलस जॅरीचा ६-१, ७-५, ६-४ असा पराभव केला.

हेही वाचा >>>टीम इंडियाचं विजयी ‘अक्षर’, दुर्लक्षित खेळाडू ते टीम इंडियाला जगज्जेतेपदाची वाट दाखवणारा ‘बापू’

सबालेन्काची माघार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिलांमध्ये जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या अरिना सबालेन्का आणि व्हिक्टोरिया अझारेन्का यांनी खांद्याच्या दुखापतीमुळे ऐनवेळी स्पर्धेतून माघार घेतली. सबालेन्काला तिसरे मानांकन देण्यात आले होते.