scorecardresearch

जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा : निखत, मनिषा, परवीनची पदकनिश्चिती

भारतीय बॉक्सिंगपटू निखत झरीन (५२ किलो), मनिषा (५७ किलो) आणि परवीन (६३ किलो) यांनी ‘आयबीए’ महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सोमवारी उपांत्य फेरीचा टप्पा गाठत आपले पदक निश्चित केले.

नवी दिल्ली : भारतीय बॉक्सिंगपटू निखत झरीन (५२ किलो), मनिषा (५७ किलो) आणि परवीन (६३ किलो) यांनी ‘आयबीए’ महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सोमवारी उपांत्य फेरीचा टप्पा गाठत आपले पदक निश्चित केले. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेती निखतने इंग्लंडच्या चार्ली-सियान डेव्हिसनला ५-० अशी धूळ चारली. युवा बॉक्सिंगपटू परवीनने ताजिकिस्तानच्या शोइरा झुल्केनारोव्हाला याच फरकाने पराभूत केले. दुसरीकडे, मनिषाने मंगोलियाच्या नामून मोनखोरला ४-१ अशा फरकाने नमवत आगेकूच केली.

उपांत्य फेरीत निखतचा सामना ब्राझीलच्या कॅरोलिना डी अल्मेडाशी होणार आहे. तसेच मनिषाचा सामना इटलीच्या इरमा टेस्टाशी होईल. नीतूला (४८ किलो) मात्र अलुआ बाल्किबेकोव्हाकडून २-३ असे पराभूत व्हावे लागले. पूजा राणीलाही (८१ किलो) याच अंतराने ऑस्ट्रेलियाच्या जेसिका बगलेने नमवले. अनामिकाचा (५० किलो) कोलंबियाच्या इनग्रीटसमोर निभाव लागला नाही व तिला ०-५ अशा पराभवाचा सामना करावा लागला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: World championship boxing championships nikhat manisha parveen medal confirmation ysh

ताज्या बातम्या