मोहाली क्रिकेट स्टेडियम २०२३ विश्वचषक स्पर्धेच्या शर्यतीतून बाहेर आहे. क्रिकेटट्रैकरवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार मोहालीच्या IS बिंद्रा स्टेडियमवर कदाचित एकही सामना खेळला जाणार नाही. वृत्तानुसार, बांधकामामुळे हा सामना खेळवला जाणार नाही. मात्र, याबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. एकदिवसीय विश्वचषक २०२३ चे सर्व ४८ सामने यावेळी भारतात होणार आहेत. या स्पर्धेसाठी देशातील बारा वेगवेगळ्या शहरांची निवड करण्यात आली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १९ नोव्हेंबरला अंतिम सामना होणार आहे. पंजाबमधील मोहाली, जिथे २०११ भारत-पाकिस्तान एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा उपांत्य सामना खेळला गेला होता, ते निवडलेल्या शहरांमध्ये नाही.
हेही वाचा: Haris Rauf Video: पीएसएल ट्रॉफी घेऊन हरिस रौफ पोहोचला वाघा बॉर्डरवर अन् चाहत्यांकडून झाला ट्रोल, Video व्हायरल
एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये एकूण ४८ सामने खेळवले जाणार आहेत. ही स्पर्धा ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाऊ शकते. यासाठी भारतातील १२ शहरांची निवड करता येईल. यामध्ये अहमदाबादचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. अंतिम सामने देखील येथे खेळले जाऊ शकतात. यासोबतच बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, धर्मशाला, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, इंदोर, राजकोट आणि मुंबईचीही नावे आहेत. २०११च्या विश्वचषकादरम्यान कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियममध्येही असाच प्रकार घडला होता. २०११ च्या विश्वचषकादरम्यान ईडन गार्डन्स स्टेडियमवर काम सुरू होते. याच कारणामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला जाणारा सामना येथे हलवण्यात आला. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला.
अंतर्गत राजकारणही चव्हाट्यावर आले
टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि पंजाब क्रिकेट असोसिएशनचा (पीसीए) मुख्य सल्लागार हरभजन सिंग याने अलीकडेच संघटनेत भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. ७ ऑक्टोबर २०२२ रोजी त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि BCCI यांना अधिकृत पत्र लिहून भ्रष्टाचाराबद्दल बोलले. त्यानंतर पीसीएची अंतर्गत चौकशी सुरू आहे. त्यामुळेही येथे दीर्घकाळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांना प्राधान्य दिले जात नव्हते.
हेही वाचा: WPL 2023: पत्नी एलिसाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मिचेल स्टार्क भारतातच पण सामन्यातील पराभवाचे हावभाव व्हायरल, पाहा Video
नवीन स्टेडियममध्ये ३४ हजार प्रेक्षक बसू शकतील
मोहालीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी नवीन स्टेडियम बांधण्याचे काम २०१७-१८ मध्ये सुरू झाले. २०१९-२० मध्ये हे स्टेडियम तयार होणार होते. मात्र कोरोनामुळे काम अर्ध्यावरच थांबवावे लागले. आता असे सांगण्यात येत आहे की नवीन स्टेडियम ९० ते ९५% तयार आहे, परंतु येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामने आयोजित करण्यासाठी २०२४ पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. एकदिवसीय विश्वचषक यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. त्यामुळे येथे सामने होऊ शकणार नाहीत. जुन्या स्टेडियमपासून १० किमी अंतरावर असलेल्या मुल्लानपूरच्या तोगा आणि तिरा गावात नवीन स्टेडियम बांधले जात आहे. महाराजा यादवेंद्र सिंह क्रिकेट स्टेडियम असे त्याचे नाव असेल. या स्टेडियममध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी स्वतंत्र मैदान असेल. यासोबतच आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी प्रेक्षक क्षमता ३५ ते ४० हजार इतकी असेल.