भारतीय संघाने २०२३ची सुरूवात विजयाने केली. आशियाई विजेत्या श्रीलंकेने अखेरच्या चेंडूपर्यंत कडवी टक्कर दिली, हेही विसरून चालता येणार नाही. भारताच्या १६२ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने १६० धावा केल्या अन् अवघ्या दोन धावांनी त्यांचा पराभव झाला. अक्षर पटेलने २०व्या षटकात श्रीलंकेला १३ धावा करू दिल्या नाही. भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे आणि पुढील सामना उद्या पुण्यात होणार आहे. पण, या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्या खेळणार की नाही, ही चिंता चाहत्यांना सतावत आहे. त्याच दरम्यान विश्वचषकविजेत्या संघाचा खेळाडू गौतम गंभीरने मोठे विधान केले आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने भारतीय संघ व्यवस्थापनाला महत्त्वाचा सल्ला दिला असून त्यांनी भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यासाठी बॅकअप शोधावा, असे म्हटले आहे. हार्दिक पांड्या हा भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा खेळाडू असून त्याला कोणतीही धोकादायक दुखापत झाल्यास त्याचे नुकसान भारतीय क्रिकेट संघाला सहन करावे लागू शकते, असे गंभीरला वाटते.

हेही वाचा: IND vs SL: १५५ किमी प्रती वेगाने उमरानचा जाळ काढणारा चेंडू…अन् श्रीलंकेचा कर्णधार झाला क्लीनबोल्ड, ‘या’ दिग्गजाचा मोडला विक्रम

पांढऱ्या चेंडूच्या फॉरमॅटमध्ये हार्दिक पांड्या हा भारतीय संघासाठी खूप खास खेळाडू आहे. त्याची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही उत्कृष्ट आहेत. याशिवाय गेल्या काही महिन्यांपासून कर्णधार म्हणूनही त्याच्यावर सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी२० मालिकेत हार्दिककडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

गौतम गंभीरला हार्दिक पांड्याच्या फिटनेसची चिंता आहे

भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडूची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा हार्दिक पांड्याचे नाव येते. मात्र, फिटनेस ही त्याची सर्वात मोठी समस्या आहे. हार्दिक त्याच्या करिअरमध्ये दुखापतींनी हैराण झाला आहे. त्याचवेळी पाठीच्या दुखापतीमुळे तो बराच काळ गोलंदाजीही करत नव्हता आणि संघातूनही बाहेर होता. हार्दिकची ही अडचण लक्षात घेऊन गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्सच्या विशेष कार्यक्रम रोड टू वर्ल्ड कप ग्लोरीमध्ये सांगितले, “४१ वर्षीय गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्स कार्यक्रमात सांगितले की, “त्यांना (टीम इंडिया) हार्दिकसाठी बॅकअप शोधावा लागेल, कारण हार्दिक पांड्याला काही झाले तर भारताची मोठी कोंडी होईल.”

हेही वाचा: IND vs SRI: ‘हा सामना रोमहर्षक बनवल्याबद्दल धन्यवाद’: लंकेविरुद्धच्या खराब प्रदर्शनाबद्दल चाहत्यांनी ‘या’ दोघांची उडवली खिल्ली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर इरफान पठाणने गंभीरचा मुद्दा पुढे नेला आणि २०११ च्या विश्वचषकातील युवराज सिंगच्या कामगिरीची आठवण करून दिली आणि म्हटले की हार्दिकच्या बॅकअपला वेगवान गोलंदाजीची गरज नाही. तो म्हणाला, “या परिस्थितीत दोन फिरकी अष्टपैलू खेळाडूही तुमच्यासाठी पुरेसे आहेत. तुमच्याकडे वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा आणि दीपक हुडा यांसारखे खेळाडू आहेत, जे फलंदाजीबरोबरच गोलंदाजांनीही विकेट घेऊ शकतात.”