World Test Championship Points Table 2025: मँचेस्टर कसोटीचा अनपेक्षित निकाल लागला आहे. आधी सामन्यावर इंग्लंडची मजबूत पकड होती. भारताच्या हातून हा सामना निसटण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. पण शेवटी रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरची जोडी खंबीरपणे उभी राहिली. इंग्लंडने पहिल्या डावात ६६९ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरने महत्वपूर्ण भागीदारी केली. त्यामुळे हा सामना ड्रॉ झाला आहे. दरम्यान हा सामना ड्रॉ राहिल्यानंतर कशी आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेची स्थिती? जाणून घ्या.

भारतीय संघ गुणतालिकेत कितव्या स्थानी?

मँचेस्टर कसोटी सामन्यात बरोबरी साधल्यानंतर भारतीय संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. भारतीय संघाने आतापर्यंत १६ गुणांची कमाई केली आहे. भारताची विजयाची सरासरी ३३.३३ इतकी आहे. तर इंग्लंडचा संघ देखील गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी कायम आहे. पण इंग्लंडच्या विजयाच्या घसरण झाली आहे. या सामन्याआधी इंग्लंडची विजयाची सरासरी ६१.११ इतकी होती. आता ही सरासरी ५१.१६ वर घसरली आहे. इंग्लंडने आतापर्यंत २६ गुणांची कमाई केली आहे.

इंग्लंडने उभारला धावांचा डोंगर

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने ३५८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडकडून २ फलंदाजांनी शतकं झळकावली. जो रूटने १५० तर बेन स्टोक्सने १४१ धावांची खेळ केली. तर जॅक क्रॉलीने ८४, बेन डकेटने ९४, ओली पोपने ७१ आणि कार्सने ४७ धावांची खेळी केली. यासह इंग्लंडने ६६९ धावांचा डोंगर उभारला.

भारतीय संघाचं दमदार पुनरागमन

या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला सुरुवातीलाच दोन मोठे धक्के दिले. यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन शून्यावर माघारी परतले. त्यानंतर केएल राहुल आणि शुबमन गिलने दमदार खेळी केली. गिलने शतक झळकावलं. तर केएल राहुलचं शतक अवघ्या १० धावांनी हुकलं. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी मिळून शतकं झळकावली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने सामना ड्रॉ केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.