WPL 2023 2nd Match RCBW vs DCW Updates: महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामातील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर ६० धावांनी मात करत आपला पहिला विजय नोंदवला. तारा नॉरिसने ५ विकेट घेत दिल्लीच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना बंगळुरु संघापुढे २२४ धावांचे मोठे लक्ष्य ठेवल होत. मात्र प्रत्युत्तरात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ निर्धारित २० षटकांत ८ बाद १६३ धावा करु शकला.

दिल्ली कॅपिटल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना शानदार सुरुवात केली. या संघाने कर्णधार मेग लॅनिंग आणि शफाली वर्माच्या वादळी खेळीच्या जोरावर पहिल्या विकेट्साठी १६२ धावाची भागीदारी केली. ज्यामध्ये मेग लॅनिंगने ४३ चेंडूंत १४ चौकारांसह ७२ धावा केल्या. त्याचबरोबर शफाली वर्माने ४५ चेंडूंत १० चौकार आणि ४ षटकारांसह ८४ धावा केल्या.

यासह तिसर्‍या क्रमांकावर उतरलेल्या मारिजने कॅपनेही धुमाकूळ घातला. तिने १७ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ३९ धावा केल्या. त्याचवेळी जेमिमा रॉड्रिग्सने १५ चेंडूत २२ धावांची नाबाद खेळी केली. दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांच्या शानदार खेळीमुळे संघाने २० षटकांत २ गडी गमावून २२३ धावांची मोठी धावसंख्या उभारली. आरसीबीकडून हेदर नाइटने दोन्ही विकेट घेतल्या.

हेही वाचा – WPL 2023: डिआंड्रा डॉटिनच्या प्रश्नावर गुजरात जायंट्सने सोडले मौन; निवेदन जारी करुन सांगितले बाहेर करण्याचे कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तारा नॉरिसने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या –

आरसीबीच्या डावाबद्दल बोलायचे तर स्मृती मंधानाने संघासाठी सर्वाधिक ३५ धावा केल्या. हीदर नाइटने ३४, अॅलिस पॅरीने ३१ आणि मेगन शुटने नाबाद ३० धावा केल्या. सोफी डिव्हाईनने १४ धावांचे योगदान दिले. दिशा कासट नऊ, रिचा घोष आणि आशा शोभना प्रत्येकी दोन धावा करून बाद झाल्या. कनिका आहुजा खाते उघडू शकली नाही. प्रीती बोसने नाबाद दोन धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून अमेरिकेच्या तारा नॉरिसने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तिचा सामनावीर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. एलिस कॅप्सीने दोन आणि शिखा पांडेने एक विकेट घेतली.