WPL 2023 2nd Match RCBW vs DCW Updates: महिला प्रीमियर लीग (WPL) नुकतीच सुरू झाली आहे. तरी देखील स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच विक्रमांचे मनोरे पाहिला मिळत आहे. रविवारी दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी करताना आरसीबी संघासमोर २२४ धावांचे लक्ष्य ठेवले. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरुद्ध कर्णधार मेग लॅनिंग आणि शफाली वर्माने शानदार फलंदाजी केली. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी १६२ धावा केल्या. यासह त्यांनी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

पहिल्या विकेटसाठी सहावी सर्वोच्च भागीदारी –

मेग लॅनिंग आणि शफाली यांची नावे डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या सामन्यात विक्रम भागीदारी करत क्रिकेट इतिहासात नोंद केली. या दोन्ही फलंदाजांनी मिळून महिला टी-२० क्रिकेट लीगमध्ये सहाव्या क्रमांकाच्या सर्वोच्च भागीदारीचा विक्रम केला. या प्रकरणात त्यांनी रेचेल प्रिस्ट आणि हीदर नाइट यांचा विक्रम मोडला. या दोघींनी वेस्टर्न स्टॉर्मकडून खेळताना यॉर्कशायर डायमंडविरुद्ध १६१ धावा केल्या होत्या. ही कामगिरी त्यांनी २०१७ मध्ये महिला क्रिकेट सुपर लीग मध्ये केली होती.

एलिस पेरी आणि अॅलिसा हिलीच्या नावावर सर्वोच्च भागीदारीचा विक्रम-

महिला टी-२० क्रिकेटमध्ये पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक मोठ्या भागीदारीचा विक्रम एलिस पेरी आणि अॅलिसा हिली यांच्या नावावर आहे. त्यांनी सिडनी सिक्सर्सकडून खेळताना डब्ल्यूबीबीएल २०१९ मध्ये मेलबर्न स्टार्सविरुद्ध १९९ धावांची नाबाद खेळी केली. हा विक्रम अद्याप तुटलेला नाही, पण डब्ल्यूपीएलमध्ये ज्याप्रकारे धावांचा पाऊस पडत आहे, ते पाहता हा विक्रम फार दूर नाही असे म्हणता येईल.

हेही वाचा – WPL 2023: डिआंड्रा डॉटिनच्या प्रश्नावर गुजरात जायंट्सने सोडले मौन; निवेदन जारी करुन सांगितले बाहेर करण्याचे कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लॅनिंगने ७२ तर शफालीने ८४ धावा केल्या –

लॅनिंगने शानदार फलंदाजी करताना ४३ चेंडूंत १४ चौकारांसह ७२ धावा केल्या. त्याचबरोबर शफाली वर्माने ४५ चेंडूंत १० चौकार आणि ४ षटकारांसह ८४ धावा केल्या. या दोघींनी पहिल्या विकेट्साठी १६२ धावांची भागीदारी केली. यासह तिसर्‍या क्रमांकावर उतरलेल्या मारिजने कॅपनेही धुमाकूळ घातला. तिने १७ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ३९ धावा केल्या. त्याचवेळी जेमिमा रॉड्रिग्सने १५ चेंडूत २२ धावांची नाबाद खेळी केली. दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांच्या शानदार खेळीमुळे संघाने २० षटकांत २ गडी गमावून २२३ धावांची मोठी धावसंख्या उभारली.