किवी बॅट्समन सोफी डिवाइनने गुजरात जायंट्सच्या विरोधात WPL मध्ये तिचं १६ वं शानदार अर्धशतक झळकावलं. तिच शतक अवघ्या एका रनने हुकलं आहे. जर तिचं शतक झालं असतं तर ही तिचं लीगमधलं हे पहिलं शतक ठरलं असतं. मात्र ९९ धावांची तिने केलेली खेळीही डोळ्याचं पारणं फेडणारी होती.
जाणून घेऊ सोफीच्या खेळीविषयी
सोफीने आजच्या सामन्यात खेळत असतानाच आक्रमक पवित्रा घेतला होता. अवघ्या २० चेंडूंमध्ये तिने तिचं अर्धशतक झळकावलं. त्यानंतरही तिने आक्रमक खेळी करत ९९ धावांची लीगमधली तिची सर्वात मोठी खेळी केली. मात्र ९९ धावांवर तिची विकेट गेल्याने तिचं लीगमधलं पहिलं शतक अवघ्या एका धावेने हुकलं. WPL मध्ये खेळताना ९ चौकार आणि ८ षटकार झळकावत तिने ९९ धावा केल्या. WPL मध्ये २० चेंडूमध्ये सोफीने अर्धशतक झळकावलं. आत्तापर्यंतचं हे तिसरं वेगवान अर्धशतक आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यात महिला प्रीमियर लीग (WPL) चा १६ वा सामना खेळला गेला. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर गुजरात जायंट्स आणि आरसीबी संघ आमने-सामने आले होते. आरसीबीने गुजरात जायंट्स ८ गडी राखून मोठा विजय मिळवला. सोफी डिव्हाईनच्या धडाकेबाज खेळीमुळे आरसीबीने सलग दुसरा सामना जिंकला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ गडी बाद १८८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आरसीबीने १५.३ षटकांत २ बाद १८९धावा केल्या. सोफी डिव्हाईनने ३६ चेंडूत ९९धावांची स्फोटक खेळी खेळली.
आरसीबी संघाने १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दमदार सुरुवात केली. सलामी फलंदाज स्मृती आणि सोफीने आक्रमक फलंदाजी करताना पहिल्या विकेट्साठी १२५ धावांची भागादारी केली. त्यानंतर कर्णधार स्मृती मंधाना ३७ धावांवर बाद झाली. तिने आपल्या खेळीत ५ चौकार आणि १ षटकार लगावला. तिला स्नेह राणाने बाद केले.