WPL 2026 Retention List: महिला प्रीमियर लीग (WPL) २०२६ च्या मेगा लिलावापूर्वी, पाचही फ्रँचायझींनी त्यांच्या रिटेन्शन यादी जाहीर केल्या आहेत. भारतीय महिला संघाने एकदिवसीय महिला विश्वचषक 2025 चे जेतेपद जिंकल्यानंतर महिला प्रीमियर लीगमध्ये कोणकोणते संघ कोणाला रिटेन करणार यावर सर्वांच्या नजरा होत्या. पण यावेळी, संघांनी अनेक मोठी नावं रिलीज करून सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे.
भारताची स्टार अष्टपैलू दीप्ती शर्मा, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वुल्व्हार्ड, ऑस्ट्रेलियाची अनुभवी कर्णधार मेग लॅनिंग आणि यष्टीरक्षक एलिसा हिली यांना रिटेन करण्यात आलेलं नाही. भारताची विश्वचषक विजेती कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, शफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांना त्यांच्या संघांनी कायम ठेवत त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
गुजरात जायंट्सने दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वुल्व्हार्डला महालिलावापूर्वी रिलीज केलं आहे. नियमांनुसार फक्त दोन विदेशी खेळाडूंनाच रिटेन केलं जाऊ शकतं , म्हणून संघाने ऑस्ट्रेलियन जोडी बेथ मुनी आणि अॅश्ले गार्डनर यांना कायम ठेवलं आहे.
यूपी वॉरियर्सने या हंगामात नवीन सुरुवात करण्याचे संकेत दिले आहेत. संघाने फक्त अंडर-१९ विश्वचषक विजेती श्वेता सेहरावतला कायम ठेवल आहे आणि इतर सर्व मोठ्या खेळाडूंना दीप्ती शर्मा, एलिसा हिली, सोफी एक्लस्टोन आणि क्रांती गौड यांना रिलीज केलं आहे.
मुंबई इंडियन्स आरसीबीचे मुख्य खेळाडू रिटेन
मुंबई इंडियन्सने ५ मुख्य खेळाडूंना रिटेन केलं आहे. ज्यामध्ये नताली स्किव्हर ब्रंट, हरमनप्रीत कौर, हिली मॅथ्यूज, अमनजोत कौर व कमालिनी यांचा समावेश आहे. तर लक्षवेधी गोष्ट म्हणजे हरमनप्रीत कौरपेक्षा सर्वाधिक रकमेला नताली स्किव्हर ब्रंटला रिटेन केलं आहे. अमेलिया केर, पूजा वस्त्राकर आणि यास्तिका भाटिया सारख्या खेळाडूंना रिलीज केलं आहे. तर आरसीबीच्या संघाने स्मृती मानधना, एलिस पेरी, रिचा घोष व श्रेयंका पाटील यांना रिटेन केलं आहे. तर सोफी मोलिनेक्स, रेणुका ठाकूर, स्नेह राणा आणि डॅनी व्याट-हॉज सारख्या मोठ्या नावांना संघाने सोडले आहे.
रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी
मुंबई इंडियन्स
नताली स्किव्हर ब्रंट (३.५ कोटी)
हरमनप्रीत कौर (२.५ कोटी)
हिली मॅथ्यूज (१.७५ कोटी)
अमनजोत कौर (१ कोटी)
जी. कमलिनी (५० लाख)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
स्मृती मानधना (३.५ कोटी)
रिचा घोष (२.७५ कोटी)
एलिस पेरी (२ कोटी)
श्रेयंका पाटील (६० लाख)
गुजरात जायंट्स
एश्ले गार्डनर (३.५ कोटी)
बेथ मुनी (२.५ कोटी)
युपी वॉरियर्ज
श्वेता सेहरावत (५० लाख)
दिल्ली कॅपिटल्स
जेमिमा रॉड्रीग्ज (२.२ कोटी)
शफाली वर्मा (२.२ कोटी)
एनाबेल सदरलँड (२.२ कोटी)
मारिजन काप (२.२ कोटी)
निकी प्रसाद (५० लाख)
