WWE मध्ये खेळणारा भारतीय खेळाडू जिंदर महालने आज भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची भेट घेतली. मुंबईतल्या  राहत्या घरी जिंदर महालने सचिनची भेट घेत डिसेंबरमध्ये दिल्लीत होणाऱ्या WWE च्या इव्हेंटला हजेरी लावण्याचं निमंत्रण दिलं. यावेळी सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही हजर होता. अर्जुन हा जिंदर महालचा प्रचंड मोठा चाहता आहे. डिसेंबरमध्ये नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोअर मैदानावर हा इव्हेंट होणार आहे. यावेळी जिंदर महालने आपली ओळख असलेला ‘Modern Day Maharaja’ चा टी-शर्ट भेट दिला.

डिसेंबरमध्ये होणाऱ्या या इव्हेंटमध्ये जिंदर महालसह, रोमन रेगिन्स, सेथ रोलिन्स, डीन अँब्रोज, ब्रॉन स्टोमॅन असे अनेक नावाजलेले खेळाडू भाग घेणार आहेत. ‘Smackdown Live’ या शोमध्ये हे सर्व खेळाडू एकमेकांशी लढणार आहेत. या भेटीचे फोटो ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहेत.

जगभराप्रमाणेच भारतातही WWE चे अनेक चाहते आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी सामन्यादरम्यान आपल्या देशाचं प्रतिनिधीत्व करायला मिळणं ही माझ्यासाठी गौरवाची बाब असल्याचं, जिंदर महालने म्हणलंय. याआधीही या इव्हेंटची पूर्वतयारी करण्यासाठी WWE चा प्रमुख ट्रिपल एच भारतात येऊन गेला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवश्य वाचा – तयार राहा, WWE भारतात येतंय! पूर्वतयारीसाठी ट्रिपल एच मुंबईत