Yashasvi Jaiswal Record with Century in IND vs ENG: यशस्वी जैस्वालने भारत वि. इंग्लंड पहिल्याच कसोटी सामन्यात शतकाने दौऱ्याला दणक्यात सुरूवात केली आहे. यशस्वी जैस्वालच्या शतकासह भारताने पहिल्या दिवशी २०० अधिक धावांचा टप्पा गाठला आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. राहुलसह चांगली सुरूवात केल्यानंतर जैस्वालने दुसऱ्या सेशनमध्ये आपलं पाचवं शतक झळकावलं आणि एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे.

इंग्लंडविरुद्ध जैस्वालचे कसोटी क्रिकेटमधील हे तिसरे शतक आहे. पण इंग्लंडच्या भूमीवर हे जैस्वालचं पहिलंच शतक आहे. जैस्वालने टीब्रेकपूर्वी १४४ चेंडूत १६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १०० धावांचा आकडा गाठला. जैस्वालने इंग्लंडविरूद्ध प्रत्येक कसोटीत ५० अधिक धावा केल्या आहेत. टी ब्रेकनंतर १ धाव करत जैस्वाल बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड होत माघारी परतला.

यशस्वी जैस्वालने या शतकासह अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. ज्यामध्ये तो ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दोन्ही देशांमध्ये पहिला कसोटी सामना खेळताना शतक करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. यशस्वी जैस्वाल हा जागतिक क्रिकेटमध्ये हा पराक्रम करणारा पाचवा खेळाडू आहे. याशिवाय, यशस्वी जैस्वाल हा इंग्लंडमध्ये शतक झळकावणारा भारताचा दुसरा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे.

भारत-इंग्लंड पहिला कसोटी सामना हेडिंग्ले येथील लीड्सच्या मैदानावर खेळवला जात आहे. या मैदानावर कसोटी सामन्यात शतक करणारा यशस्वी जैस्वाल पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे. याआधी कोणत्याच खेळाडूने असा पराक्रम केला नव्हता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल इंग्लंडमध्ये त्याच्या पहिल्याच कसोटी सामन्याच्या डावात शतक झळकावणारा पाचवा भारतीय फलंदाज बनला आहे. यासह, यशस्वी जैस्वाल आता सौरव गांगुली आणि संदीप पाटील यांच्या यादीत सामील झाली आहे, ज्यांनी ही कामगिरी केली आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासातील यशस्वीचे हे पाचवे कसोटी शतक आहे. ज्यामध्ये तो आता भारताकडून WTC मध्ये सर्वाधिक शतकं करण्याच्या बाबतीत कर्णधार शुबमन गिल आणि विराट कोहलीसह दुसऱ्या स्थानावर आहे.