भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील दुसरा कसोटी सामना तिसऱ्या दिवशीच रोमांचक वळणावर पोहोचला. दक्षिण आफ्रिकेने भारताचा पहिला डाव २०२ धावांवर रोखला, त्यानंतर शार्दुल ठाकूरच्या अप्रतिम कामगिरीमुळे टीम इंडियाने यजमानांचा पहिला डाव २२९ धावांत गुंडाळला. यानंतर भारताला दुसऱ्या डावात २६६ धावा करता आल्याने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २४० धावांचे लक्ष्य दिले.

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २ बाद ११८ धावा केल्या होत्या. वाँडरर्स स्टेडियममध्ये दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांवर वर्चस्व राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसले. कधी जसप्रीत बुमराह आणि मार्को यानसेन यांच्यात मैदानावर वाद झाला, तर कधी गोलंदाज अंपायरवर दबाव टाकताना दिसले. यादरम्यान परिस्थिती अशी बनली, की मैदानावरील पंच मारियास इरास्मस देखील नाराज झाल्याचे दिसून आले.

हेही वाचा – दक्षिण आफ्रिकेहून विराटनं आईला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; Photo पाहून तुम्हीही म्हणाल, ‘‘किती गोड..!”

इरास्मस यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते म्हणत आहेत, ”तुम्ही लोक मला हृदयविकाराचा झटका देत आहात.” दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावातील १०व्या षटकात ही घटना घडली. शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर एडन मार्कराम बाद झाला. मात्र, तो बाद होण्यापूर्वी भारतीय वेगवान गोलंदाज ठाकूरने एकाच षटकात दोन अपील केले. षटक संपल्यानंतर, खेळाडू आपापसात बोलत असताना, इरास्मस यांचे हे बोलणे स्टंम्प माइकमधून ऐकू आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय संघाने पहिला कसोटी सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी कायम राखली आहे. जोहान्सबर्ग कसोटी जिंकल्यास भारताला मालिकेत विजयी आघाडी मिळेल. या कसोटीच्या चौथ्या दिवशी पावसाने व्यत्यय आणला आहे.