Yuzvendra Chahal And Dhanashree verma Relationship : भारतीय क्रिकेटर्स मैदानातच नाही तर मैदानाच्या बाहेरही प्रकाशझोतात राहतात. खेळाडू जिथे जातात, त्या ठिकाणी स्पॉटलाईट त्यांच्या मागे मागे जाते. भारत आणि राजस्थानचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहल आणि आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्याबाबतीतही असंच काहीसं घडतं. दोघेही कोरोना लॉकडाऊन दरम्यान पहिल्यांदा भेटले होते. ते डान्स क्लास घेत होते. धनश्री प्रसिद्ध डान्सर आहे आणि सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने डिसेंबर २०२० मध्ये लग्न केलं. चहलने धनश्रीला आता लग्नाच्या प्रपोजलबाबत एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. त्याने एका युट्यूब चॅनेलवर मुलाखत देताना म्हटलं, मी माझ्या गुरुग्राम येथील घरी दिर्घकाळासाठी राहिलो. जवळपास तीन ते चार महिने मी माझ्या कुटुंबियांसोबत आणि घरच्या पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवून आनंद साजरा केला. मला नेहमी डान्स करणं शिकायचं होतं. त्यानंतर मला समजलं की, धनश्री ऑनलाईन क्लासेस घेते. त्यामुळे मी दोन महिने ऑनलाईन क्लास सुरु केलं.

नक्की वाचा – सचिन तेंडुलकरचं ‘या’ क्षेत्रात पदार्पण; एम एस धोनीबाबत दिली मोठी प्रतिक्रिया, ट्वीटरवर म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चहलने पुढं म्हटलं, त्यानंतर एक दिवस मी तिला विचारलं, तू जीवनात एव्हढी खूष का आहे? तिने उत्तर देत म्हटलं, मी अशीच आहे. मी छोट्या छोट्या गोष्टींमधून आयुष्यात आनंद शोधत असते. मला तिचं बोलणं आवडलं आणि मी माझ्या कुटुंबियांना सांगितलं. मी तिला म्हणालो, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तुझ्यासोबत डेट करायचं नाही. मला आधी तुला भेटायचं आहे. आपण याआधी कधीच नाही भेटलो. आपण मुंबईत भेटलो आणि तेव्हा तिने हो म्हटलं. चहल इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत असून सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये त्याच्या नावाची नोंद झालीय.