या आसनात शरीर अध्र्या नांगराप्रमाणे दिसते. मधुमेह, उच्चरक्तदाब, मूळव्याध, बद्धकोष्ट इत्यादी आजार असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि योग्य प्रकार केल्यास फायदा होतो. कसे करावे? * पाठ जमिनीला टेकवून हात, पाय जमिनीवर सरळ रेषेत राहतील, अशा स्थितीत झोपा. * दोन्ही पाय एकमेकांना जुळवून गुडघ्यांत न वाकवता हळूहळू वर नेत ३० अंशांच्या कोनात आणा. * काही क्षण तसेच राहून नंतर पाय ६० अंशांच्या कोनात आणा. * पाय आणखी वर नेत काटकोणात आणा. * ही आसनाची अंतिम स्थिती आहे. यात कमरेपासून खांद्यांपर्यंतचा भाग सरळ असणे आवश्यक आहे. * सहज शक्य असेल तेवढा वेळ या स्थितीत राहा. त्यानंतर डोके वर येणार नाही याची काळजी घेत पाय हळूहळू पुन्हा जमिनीवर आणा.