डॉ. सारिका सातव

साहित्य

* हिरवा वाटाणा- दोन वाटी

*  बटाटे- २

*  पनीर- ३० ते ४० ग्रॅम

*  मसाला, मीठ- चवीनुसार

*  गव्हाचे पीठ- तीन वाटी

*  तेल

कृती

*  सोललेला हिरवा वाटाणा, बटाटा, पनीर हे सारणासाठी वापरावे.

*  वाटाणा, बटाटा, पनीर हे मसाला, मीठ घालून सुक्या भाजीप्रमाणे तयार करून घ्यावे.

*  गव्हाचे पीठ मळून छोटय़ा पुऱ्यांप्रमाणे लाटून घ्यावे.

*  वरील सारण त्यात भरून करंजी प्रमाणे आकार द्यावा.

*  या करंज्या तळून घ्याव्यात किंवा ओव्हनमध्ये बेक कराव्यात.

विशेषत:

*  लहान मुलांसाठी उत्तम नाश्ता.

* डब्याला नेण्यासाठी उत्तम पदार्थ.

* आवडीप्रमाणे इतर भाज्या त्यात टाकू शकता.

* तळण्याऐवजी बेक केले तरी उत्तम.

* प्रथिने, ब जीवनसत्त्व, तंतुमय पदार्थ जास्त

* मैद्याऐवज गव्हाचे पीठ वापरल्याने अतिशय आरोग्यदायी