Hyundai कंपनीने या महिन्याच्या सुरूवातीला बीएस-6 इंजिनच्या Elite i20, Grand i10 आणि Venue या गाड्यांसाठी बुकिंगा सुरुवात केली. लवकरच या गाड्या भारतीय बाजारात उतरवल्या जाणार आहेत. पण, त्यापूर्वीच BS6 Hyundai i20 ची किंमत ‘लीक’ झाली आहे. 6.49 लाख ते 8.31 लाख रुपये इतकी एक्स-शोरुम किंमत असण्याची शक्यता आहे. नवीन बीएस-6 i20 केवळ पेट्रोल इंजिनमध्येच येईल अशीही माहिती मिळालीये.

(आणखी वाचा – टू-व्हीलरमध्ये ‘ही’ ठरली नवीन BOSS, ‘स्प्लेंडर’वर केली मात)

27 Year Old Youtuber Abhideep Saha Dies Video of No Passion No Vision In Memes
२७ वर्षीय प्रसिद्ध भारतीय युट्युबरचे निधन; एकाच वेळी अवयव झाले निकामी, कष्टाने कमावले होते ५ लाख सबस्क्राइबर्स
Is this waitress serving at a restaurant in China robot or human
रोबोट आहे की तरुणी? चीनी रेस्टॉरंटमधील वेट्रेसची एकच चर्चा, Video पाहून सांगा, तुम्हाला काय वाटते?
Air India Air Transport Services jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती! ‘या’ पदांवर होणार भरती
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  

(आणखी वाचा – Hero ने आणली ‘झकास’ बाइक, Pulsar-Apache ला टक्कर)

मिळालेल्या माहितीनुसार, बीएस6 इंजिनमध्ये अपग्रेड करण्याशिवाय कंपनीने i20बीएस-6 मॉडेलमधील बेसिक व्हेरिअंट Era, पेट्रोल-सीव्हीटी Sportz+ आणि Asta(O) बंद केले आहेत. व्हेरिअंटच्या आधारे या गाडीच्या किंमतीत 15 हजार रुपयांची वाढ झाली आहे. तर बेसिक व्हेरिअंटच्या किंमतीत जवळपास 90 हजार रुपयांची वाढ झाली आहे. बीएस-6 मॉडेलमध्ये सध्याचे बेसिक व्हेरिअंट Era बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतल्यामुळे किंमतीत इतकी वाढ झाली. फीचर्सबाबत बोलायचं झाल्यास, बीएस-4 मॉडेलच्या तुलनेत बीएस-6 मॉडेलच्या बेसिक व्हेरिअंटमध्ये अधिक फीचर्स मिळतील. Magna+ व्हेरिअंटमध्ये 2-DIN ऑडिओ सिस्टिम, एलईडी डीआरएल, रिमोट लॉकिंग, इलेक्ट्रिक अॅड्जस्ट विंग मिरर्स आणि रिअर एसी व्हेंट्स यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे. तर, टॉप व्हेरिअंटमध्ये 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, ऑटो क्लायमेट कंट्रोल, साइड आणि कर्टन एअरबॅग्स व रिव्हर्स कॅमेरा यांसारखे फीचर्स मिळतील.

(आणखी वाचा – तेव्हा गाढव बांधून काढली होती धिंड, आता SUV ने 8 महिन्यांमध्येच केला धमाका)

इंजिन :
बीएस-6 i20 मध्ये ग्रँड आय10 नियॉसचे 1.2-लीटर पेट्रोल इंजिन मिळेल. आय10 नियॉसमध्ये हे इंजिन 83hp ची पावर आणि 114Nm टॉर्क निर्माण करते. तर, पेट्रोल-ऑटोमॅटिक किंवा डिझेल इंजिनची i20 खरेदी करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी सध्या केवळ बीएस-4 मॉडेलचा पर्याय असेल. कंपनी लवकरच नेक्स्ट-जनरेशन i20 लाँच करणार असून, गाडीत केवळ डिझेल इंजिन दिले जाण्याची शक्यता आहे.

(आणखी वाचा – टू-व्हीलरमध्ये ‘ही’ ठरली नवीन BOSS, ‘स्प्लेंडर’वर केली मात)

आणखी वाचा – (स्टॉक संपवण्यासाठी TATA च्या गाड्यांवर ‘बंपर’ डिस्काउंट)

आणखी वाचा – (मारुतीची ‘रावडी’ SUV! पहिली झलक दिसताच चर्चांना उधाण)

आणखी वाचा -(Mahindra चा जलवा! सिंगल चार्जमध्ये तब्बल 520 Km धावणार , 5 सेकंदात 100 चा स्पीड)

आणखी वाचा -(देशातील 10 सर्वाधिक Popular Cars , ‘ही’ ठरली बेस्ट ; बघा संपूर्ण यादी)

आणखी वाचा – (किंमत फक्त…, शानदार ‘स्पोर्टी लुक’मध्ये लाँच झाली Maruti Ignis)