News Flash

Airtel ची ऑफर, युजर्सना ‘अशाप्रकारे’ मिळेल 2GB पर्यंत फ्री डेटा

PepsiCo चे प्रोडक्ट्स खरेदी केल्यास खास ऑफर

टेलिकॉम कंपनी भारती एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर आणत असते. आता एका नव्या सेवेनुसार कंपनी आपल्या प्रीपेड युजर्सना 2जीबीपर्यंत मोफत डेटा देत आहे. यासाठी एअरटेलने खाद्य पदार्थ बनवणाऱ्या PepsiCo (पेप्सीको) सोबत भागीदारी केली आहे. ऑफरनुसार पेप्सीकोचे प्रोडक्ट्स खरेदी करणाऱ्यांना एका कूपन कोडद्वारे 2जीबीपर्यंत मोफत डेटा मिळू शकतो.

अशाप्रकारे मिळेल 2GB फ्री डेटा :-
टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, एअरटेलच्या ग्राहकांना Lays चिप्स, Doritos आणि कुरकुरे यांसारख्या पेपिस्को प्रोडक्टच्या सर्व प्रमोशनल पॅकसोबत एक कूपन कोड मिळेल. एअरटेल प्रीपेड ग्राहक या कोडचा वापर जास्तीत जास्त तीन वेळेस करु शकतात. तिन्ही वेळेस वेगवेगळा कोड असणं आवश्यक आहे. हा 12 अंकांचा Airtel Promo कोड प्रमोशनल पॅकेटच्या आतमध्ये लिहिलेला असेल. कोड मिळाल्यानंतर युजर्स Airtel Thanks अ‍ॅपद्वारे My Coupons सेक्शनमध्ये जाऊन वापर करु शकतात. पण प्रत्येक कोडवर वेगवेगळ्या अमाउंटचा फ्री डेटा ग्राहकांना मिळेल. पॅकेटच्या किंमतीवर तो अवलंबून असेल. ही ऑफर 3 ऑगस्ट 2020 पासून सुरू होत असून 31 जानेवारी 2021 पर्यंत वैध असेल. ऑफरअंतर्गत मिळणारा फ्री डेटा तीन दिवसांसाठी असेल.

हे सामान खरेदी केल्यास मिळेल कोड –
हा कोड ग्राहकांना चार प्रकारचे प्रोडक्ट- Lays चिप्स, Doritos, कुरकुरे आणि अंकल चिप्ससोबत मिळेल. 10 रुपये आणि 20 रुपयांच्या पॅकेटमध्येही हा कोड मिळेल. पण, पॅकेट खरेदी करताना ते प्रमोशनल पॅकेट असणं गरजेचं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 4:13 pm

Web Title: airtel prepaid customers can get 2gb free data on select pepsico products check details sas 89
Next Stories
1 जाणून घ्या, लाल भोपळा खाण्याचे ‘हे’ ५ गुणकारी फायदे
2 Jio चे 400 पेक्षा कमी किंमतीचे दोन भन्नाट प्लॅन, मिळेल 84GB डेटा
3 पुणे, नाशिक, साताऱ्यातील विषाणूचे युरोपमधील करोनाशी साधर्म्य
Just Now!
X