सर्वाधिक मोबाइल युजर्स असलेल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश आहे. स्वस्त स्मार्ट फोन, स्वस्तात उपलब्ध असलेले डेटा पॅक यामुळे इंटरनेट वापरणाऱ्यांचीही संख्या अधिक आहे. ‘कॉमस्कोअर’च्या अहवालानुसार भारतीय त्यांच्या एकूण डिजिटल मिनिट्सपैकी ९० % वेळ ही मोबाइलवरून ऑनलाइन राहण्यात खर्च करतात. जगभरातील लोक मोबाइल आणि डेक्सटॉपवरून किती वेळ सोशल मीडियावर ऑनलाइन असतात, किती वेळ ते खर्च करतात या डिजीटल मिनिट्सचा अहवाल ‘कॉमस्कोअर’नं प्रसिद्ध केला. त्यानुसार भारतीय हे आपल्या एकूण वेळेपैकी ९० % टक्के वेळ मोबाइलवरून सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात असं समोर आलं आहे.

भारतीयांपाठोपाठ इंडोनेशिया, मेक्सिको आणि अर्जेंटिनाचा क्रमांक लागतो. या देशातील लोक अनुक्रमे ८७%, ८०% आणि ७७% मिनिटे मोबाइलवरून ऑनलाइन राहतात. मोबाइलच्या कमी किमती आणि स्वस्त डेटा पॅक यामुळे मोबाइलवरून ऑनलाइन असणाऱ्यांची संख्या वाढल्याचं म्हटलं जात आहे. एक भारतीय सरासरी ३ हजार मिनिटे मोबाइलवरून ऑनलाइन असतात तर डेक्सटॉपवरून तुलनेनं ते फक्त १ हजार २०० मिनिटेच ऑनलाइन राहण्यास खर्च करतात असं कॉमस्कोअरनं म्हटलं आहे. या अहवालानुसार भारतीय युजर्स व्हॉट्स अॅप, गुगल प्ले, युट्युब, जीमेल आणि गुगल सर्चचा सर्वाधिक वापर करतात.