24 February 2019

News Flash

बजाजची Pulsar 150 classic बाजारात दाखल

जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

ऑटोमोबाईल हे वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. ग्राहकांची सोय आणि बाजारातील ट्रेंड लक्षात घेऊन दिवसागणिक बाजारात नवीन बाईक दाखल होत आहेत. बजाज या ऑटोमोबाईलमधील नामांकित कंपनीने नुकतेच आपल्या पल्सर या दुचाकीचे नवे मॉडेल लाँच केले आहे. विशेष बाब म्हणजे बजाज पल्सर रियर डिस्क व्हेरियंट लॉन्च केल्यावर दोन महिन्यांच्या आतच कंपनीने आणखी एक बाईक लाँच करत ग्राहकांना खुश केले आहे. ही बाईक म्हणजे क्लासिक एडिशन असून या एडिशनची किंमत ६७,४३७ आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ही गाडी रियर ड्रम ब्रेक व्हेरियंटपेक्षा सुमारे ६,६३७ रूपयांनी स्वस्त आहे.

सध्या ही गाडी केवळ काळ्या रंगात उपलब्ध असून नव्या गाडीत आधीच्या मॉडेलपेक्षा फारसा फरक नाही. पल्सर क्लासिक १५० मध्ये रियर डिस्क व्हेरियंटप्रमाणेच १४९ सीसी पॉवर एअर कूल्ड, सिंगल-सिलिंडर बीएसआईव्ही इंजिन आहे. या बाईकची मोटार ८००० rpm मध्ये १४PS आणि ६०००rpm मध्ये १३.४ एनएम टॉर्क देते. या बाईकची स्पर्धा होंडा यूनिकॉर्न १५० आणि हीरो एक्सट्री स्पोर्टस तसेच हिरो अचीवर या बाईकसोबत आहे.

First Published on June 13, 2018 3:21 pm

Web Title: bajaj pulsar 150 classic launched know features and price