18 September 2020

News Flash

ब्रेस्ट फिडींग करताना ‘या’ गोष्टीकडे दुर्लक्ष करु नका

बाहेरच्या दुधामुळे बाळाला संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याला पहिले सहा महिने बाहेरचं दूध देऊ नये

बाळाचा जन्म झाल्यानंतर प्रथम त्याला आईचे दूध द्यावे लागते. आईचे दूध हे बाळासाठी अमृत मानले जाते. त्यामुळेच जन्मापासून ते पुढील सहा महिने तरी बाळाला आईचेच दूध द्यावे. बाहेरच्या दुधाचा आणि पाण्याचा बाळाला संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे पहिले सहा महिने बाळाला बाहेरचं दूध देऊ नये. स्तनपानाचे फायदे बाळाबरोबर आईलाही होत असतात. हे फायदे केवळ शारीरिक नसून मानसिकही असतात. स्तनपानामुळे आई व बाळामधील भावनिक बंध घट्ट होण्यास मदत होते. परंतु अनेक वेळा पहिल्यांदाच आई झालेल्या महिलांना बाळा दूध कसं पाजावं हे समजत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा बाळाचं पोट रिकाम राहतं. तसंच बाळाला दूध पाजताना त्याला नीट पकडलं नाही तरी त्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे बाळाला दूध पाजताना पुढील काळजी घ्यावी. –

१. बाळाला नीट पकडा –
लहान बाळाला दूध पाजताना त्यांना नीट धरायला हवं. पहिल्यांदाच बाळाला दूध पाजताना आईला बऱ्याच गोष्टी ठावूक नसतात. त्यामुळे तिला दूध पाजताना अडचणी येऊ शकतात. मात्र घरातील मोठ्या महिलांकडून नीट माहिती घेऊन बाळाला दूध पाजावं. बाळाला दूध पाजताना त्याला कायम नीट पकडावं.

२. आईने योग्य स्थितीत बसणे-
बाळाला दूध पाजत असताना कधीही महिलांनी खुर्चीवर किंवा दूध पाजताना अडथळा निर्माण होईल अशा स्थितीत बसू नये. कायम बाळ कम्फर्टेबल राहिलं याची काळजी घेऊन आईने बसावं. शक्यतो जमिनीवर चादर टाकून किंवा मांडी घालून बसावं. तसंच बाळाच्या डोक्यावरुन हात फिरवत त्याला झोपविण्याचा प्रयत्न करावा.

वाचा : घोरण्यामुळे त्रस्त आहात?; तर मग जीवनशैलीत करा ‘हे’ बदल

३. दूध पिताना बाळाच्या हालचालींकडे लक्ष द्यावे –
पहिल्यांदाच आई झाल्यानंतर आपल्या बाळाला नेमकी कधी भूक लागते हे स्त्रियांना पटकन समजत नाही. त्यामुळे बाळाच्या प्रत्येक हालचालीकडे बारीक लक्ष द्यावं. बऱ्याचदा बाळ भूक लागल्यानंतर तोंडात अंगठा किंवा हाताची बोटं तोंडात टाकतात. त्यावेळी समजावं की बाळाला भूक लागली आहे.

वाचा : उंची वाढत नाहीये? करा हे उपाय; नक्कीच होईल फायदा

४. डॉक्टरांचा सल्ला –

स्तनपानाची नेमकी प्रक्रिया माहिती नसल्यास किंवा स्तनपान करताना अडचण येत असेल तर काही घरगुती उपचार करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2019 1:58 pm

Web Title: breast feeding keep these things in mind while feeding the baby know what is the right way advantage ssj 93
Next Stories
1 Yamaha ची लोकप्रिय स्पोर्ट बाइक R15 , बीएस-6 इंजिनसह झाली लाँच
2 घोरण्यामुळे त्रस्त आहात?; तर मग जीवनशैलीत करा ‘हे’ बदल
3 उंची वाढत नाहीये? करा हे उपाय; नक्कीच होईल फायदा
Just Now!
X