Burn Home Remedies : करोना व्हायरसमुळे अनेकजण वर्क फ्रॉम होम करत आहेत. अशातच लोक ऑफिसच्या कामाबरोबर घरातील कामेही करत आहेत. स्वयंपाक घरात काम करताना अनेकवेळा नकळत किंवा निष्काळजीपणामुळे गरम पाणी पडल्याने किंवा पेटल्याने वा गरम भांड्याला हात लागल्याने आपण भाजले जातो. भाजल्यामुळे जखमही होतात. कधी हे भाजणं साधं असतं तर कधी गंभीर रूप धारण करतं. जखम तीव्र, मध्यम किंवा तीव्र रक्तस्त्रावी असते. अशात भाजल्यानंतर काहीजण थंड पाण्यात हात ठेवायला किंवा भाजलेल्या ठिकाणी बर्फ लावण्याचा सल्ला दिला जातो पण अशा परिस्थितीत अनेकवेळा काय करावं हे सुचत नाही.. अशावेळी प्रत्येकजण भाजल्यानंतरची जळजळ कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. अशावेळी केलेल्या उपाय मुळे नुकासानही होण्याची शक्यता असते. पाहूयात भाजल्यानंतर नेमकी काय काळजी घ्यायला हवी….

थंड पाण्यापासून दूर राहा – तज्ज्ञांच्या मते शरीराचा कोणताही भाग जळाल्यास तो भाग तात्काळ पाण्याच्या खाली घ्या.. कमीत कमी २० मिनिट जळालेला भाग नॉर्मल पाण्याच्या खाली ठेवा. लक्षात ठेवा पाणी थंड नसावे. रुमच्या तापमानासारखं पाणी असावं. जळालेल्या किंवा भाजलेल्या भागावर बर्फ लावू नका.

जखमेवरील फोड फोडू नये – अनेकवेळा भाजलेल्या किंवा जळालेल्या भागावर फोड येतात. या फोडाला हात लावू नका किंवा फोडू नका. अन्यथा त्याजागी किटाणू होण्याची शक्यता आहे.

एण्टी-बायोटिकचा वापर करू नका – तज्ज्ञांच्या मते थोड्याफार प्रमाणात पोळलं किंवा भाजल्यास एण्टी-बायोटिकचा वापर करू नका. औषधांच्या वापरामुळे जळालेली जागा स्टरिलाइज होऊ शकते.

टूथपेस्टचा वापर टाळा – तज्ज्ञांच्या मते तूप, तेल, टूथपेस्ट किंवा कोणताही तरल पदार्थ जखमेवर लावू नये

उन्हात जाणं टाळा – भाजल्यानंतर सुरूवातीचे तीन दिवस त्या जखमेला उन्हापासून दूर ठेवा. सुर्याच्या किरणामुळे जखम वाढण्याची शक्यता आधिक असते.

– भाजलेल्या भागाला कापूस किंवा कापडाने झाकू नये.