25 October 2020

News Flash

सर जे.जे महाविद्यालयाने असे केले कलात्मक सीमोल्लंघन

कोरियन आणि भारतीय चित्रकारांचे ‘बियाँड द फ्रेम्स’ चित्रप्रदर्शन

सर जे.जे. महाविद्यालयात १३ ते १८ ऑक्टोबरदरम्यान सात दिवसीय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये चौकटीपलिकडे जाऊन कलांचे सादरीकरण करण्यात येणार असल्याने एकप्रकारे सीमोल्लंघन होणार असल्याचे म्हणता येईल. भारतीय आणि कोरियन चित्रकारांचे ‘बियाँड द फ्रेम्स’ अर्थात ‘चौकटीपल्याड’ संयुक्त चित्रप्रदर्शन आयोजित केले आहे. जे. जे महाविद्यालय आणि दक्षिण कोरियातील के-आर्ट इंटरनॅशनल एक्स्चेंज असोसिएशन यांनी चेन्नईतील इंडिया-कोरिया सेंटरच्या सहकार्याने प्रथमच ‘मुंबई-कोरिया बिनाले’ या संयुक्त चित्रप्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. या आगळ्यावेगळ्या चित्रप्रदर्शनाच्या शनिवारच्या उदघाटन सोहळ्याला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, दिल्लीतील ललिक कला अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचारणे, कोरियातील अंगुक झेन सेंटरचे संचालक सुबुल सुनिम, कोरियाचे सदिच्छादूत वेणू श्रीनिवासन, कोरियाचे कौन्सुल जनरल किम साउंग्यून आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

याविषयी अधिक माहिती देताना सर ज. जी. कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे म्हणाले, “तब्बल १६६ वर्षांची समृद्ध परंपरा तसंच भारतीय व जागतिक कलाक्षेत्रात नावलौकिक असलेले सर जे.जे. कला महाविद्यालय कलाशिक्षणासोबत अनेक कलात्मक उपक्रमही राबवत असते. शैक्षणिक, कलात्मक तसंच सांस्कृतिक आदान-प्रदानतेच्या जाणिवेतून दक्षिण कोरिया व भारतातील मुख्यत: मुंबईतील चित्रकार शिल्पकार यांना एकत्रितपणे या प्रदर्शनाच्या निमित्ताने आम्ही मुंबईकरांसमोर आणत आहेत. ‘मुंबई-कोरिया बिनाले’ हे चित्रप्रदर्शन यापुढे दर दोन वर्षांतून एकदा आयोजित केलं जाणार आहे.”

“के-आर्ट फाऊंडेशनच्या अध्यक्षा ह्यू सुक या प्रदर्शनाच्या मुख्य संकल्पनाकार व क्युरेटर आहेत, तर मुंबईतील जबाबदारी अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे, प्रा.डॉ.गणेश तरतरे, प्रा. अनंत निकम आणि प्रा.मधुकर वंजारी यांनी सांभाळली आहे. प्रभारी कलासंचालक प्रा. राजीव मिश्रा व इंको सेंटरच्या संचालिका डॉ. रती जाफर यांचेही सक्रीय सहकार्य या प्रदर्शनाला लाभले आहे”, अशी माहिती चित्रप्रदर्शनाच्या समन्वयिका व अधिव्याख्याता स्मिता किंकळे यांनी दिली. सर ज. जी. कला महाविद्यालयातील शनिवार १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता या चित्रप्रदर्शनाचे मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन होणार आहे. कोरियातील १२० तर महामुंबई क्षेत्रातील ७०हून अधिक चित्रकार, शिल्पकार, प्रिंटमेकर्स यांच्या कलाकृती एकत्रीतपणे अनुभवण्याची संधी या प्रदर्शनामुळे कलारसिकांना उपलब्ध होणार असून हे चित्रप्रदर्शन १४ ते १८ ऑक्टोबर २०१८ दरम्यान सर्वांसाठी खुले राहील, असं प्रा. विश्वनाथ साबळे यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 6:35 pm

Web Title: exhibition in j j school of arts indian and korean artist will perform together
Next Stories
1 कार विम्याबद्दल या गोष्टी माहित असायलाच हव्यात
2 ५२५ रुपयात BSNL देणार ८० जीबी डेटा
3 लोकसत्ताच्या बातम्या व्हॉट्स अॅपवर
Just Now!
X