03 December 2020

News Flash

1 सप्टेंबरपासून देशात ‘वीज बिल माफी’ योजनेअंतर्गत प्रत्येकाचं बिल माफ होणार? जाणून घ्या सत्य

व्हायरल मेसेजमुळे अनेकजण संभ्रमात...

(संग्रहित छायाचित्र)

1 सप्टेंबरपासून अर्थात आजपासून प्रत्येकाचं वीज बिल माफ होणार, असे अनेक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत वीज बिल माफ होणार असल्याचं या व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये म्हटलं आहे. याशिवाय युट्यूबवरही एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सरकार वीज बिल माफी योजना 2020 आणत आहे. या अंतर्गत सप्टेंबरपासून प्रत्येकाचे वीज बिल माफ केले जाईल असे सांगितले जात आहे. हा मेसेज आणि व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला असून याची दखल घेत थेट सरकारच्या पत्रसूचना विभागालाच (पीआयबी) याबद्दल खुलासा करावा लागला आहे.

पीआयबी फॅक्ट चेक :-

पीआयबी फॅक्ट चेक केंद्र सरकारच्या पॉलिसी / योजना / विभाग / मंत्रालयांविषयी चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी कार्य करते. सरकारशी संबंधित कोणतीही बातमी सत्य किंवा असत्य आहे हे जाणून घेण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकची मदत घेतली जाऊ शकते. कोणीही PIB Fact Check ला संशयास्पद बातमीचा स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा युआरएल व्हॉट्सअप नंबर 918799711259 वर पाठवू शकतं. यशिवाय, pibfactcheck@gmail.com या ईमेल आयडीवर मेल देखील करु शकतात.

काय आहे सत्य ?-

एका युट्यूब व्हिडिओमध्ये एक सप्टेंबरपासून देशभरात वीजबिल माफी योजना 2020 अंतर्गत प्रत्येकाचं वीज बिल माफ होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. पण, पीआयबी फॅक्टचेकने हा दावा खोटा असल्याचं स्पष्ट केलं असून केंद्र सरकारने अशाप्रकारच्या कोणत्याही योजनेची घोषणा केलेली नाही असं म्हटलं आहे.


याशिवाय, पीआयबी फॅक्ट चेकने लोकांना अशाप्रकारच्या खोट्या व फेक बातम्यांपासून सावध रहाण्याचा इशारा दिला आहे.

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 12:43 pm

Web Title: fake claim of electricity bill waiver scheme 2020 electricity bill will be waived from 1st september 2020 claim is fake sas 89
Next Stories
1 Redmi Note 9 Pro आणि Redmi Note 9 Pro Max ‘सेल’मध्ये खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या डिटेल्स
2 Airtel ग्राहकांसाठी ‘गिफ्ट’, फ्री मिळतोय 6GB पर्यंत 4G डेटा; जाणून घ्या डिटेल्स
3 किंमत 11,999 ; 48MP क्वॉड कॅमेरा सेटअप + 5000mAh बॅटरी, ‘बजेट’ स्मार्टफोन खरेदीची आज संधी
Just Now!
X