23 November 2020

News Flash

तातडीने Delete करा 29 धोकादायक Apps, गुगलने प्ले स्टोअरवरुनही हटवले

जवळपास 35 लाखांपेक्षा जास्तवेळेस झालेत डाउनलोड...

गुगल प्ले-स्टोअरवर काही धोकादायक अ‍ॅप्स असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. आता पुन्हा एकदा गुगलने प्ले-स्टोअरवरील २९ धोकादायक अ‍ॅप्सना हटवलं आहे. हटवण्यात आलेले बहुतांश फोटो एडिटिंग अ‍ॅप्स आहेत.

हे धोकादायक अ‍ॅप्स फोनमध्ये adware (एडवेअर) इंस्टॉल करत होते. White Ops च्या इंटेलिजन्स टीमने या धोकादायक अ‍ॅप्सची माहिती सर्वप्रथम दिली. हे अँड्रॉइड अ‍ॅप्स ‘आउट-ऑफ-कॉन्टेक्स्ट’ (OOC) जाहिराती दाखवायचे. युजर्सनी हे अ‍ॅप्स इस्टॉल केल्यानंतर लगेच त्यातील बहुतांश अ‍ॅप्सचा ‘आइकॉन’ गायब व्हायचा, त्यामुळे या अ‍ॅप्सना पुन्हा डिटेक्ट करता येत नव्हतं. तर, प्ले-स्टोअरवरही त्या अ‍ॅपसाठी ‘Open’चा पर्याय दिसायचा नाही. जवळपास 35 लाखांपेक्षा जास्त जणांनी हे धोकादायक अ‍ॅप्स डाउनलोड केले आहेत. गुगलने प्ले स्टोअरवरुन हटवले असले तरी, ज्यांच्या फोनमध्ये आधीपासून हे अ‍ॅप्स आहेत, त्यांना ते स्वतः डिलिट करावे लागणार आहेत.

ही आहे हटवलेल्या अ‍ॅप्सची यादी :-
– Auto Picture Cut
– Color Call Flash
– Square Photo Blur
– Square Blur Photo
– Magic Call Flash
– Easy Blur
– Image Blur
– Auto Photo Blur
– Photo Blur
– Photo Blur Master
– Super Call Screen
– Square Blur Master
– Square Blur
– Smart Blur Photo
– Smart Photo Blur
– Super Call Flash
– Smart Call Flash
– Blur Photo Editor
– Blur Image

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2020 2:23 pm

Web Title: google bans 29 apps for injecting adware uninstall them right away get details sas 89
Next Stories
1 BSNL ची खास ऑफर आता 31 ऑगस्टपर्यंत, कॉलच्या बदल्यात 50 रुपये कॅशबॅक!
2 48 MP कॅमेऱ्यासह 5,000mAh ची बॅटरी, Infinix Hot 9 Pro खरेदी करण्याची संधी
3 आता ‘पॉवरफुल’ रॅमसह खरेदी करा Redmi Note 9 Pro Max, किंमत किती?
Just Now!
X