स्वयंपाक घरातील भाज्यांमधील सगळ्यात महत्त्वाचा असतो, तो म्हणजे कांदा. कोणतीही भाजी किंवा उसळ करायची असली की कांदा हा लागतोच. चवीने तीक्ष्ण पण पदार्थाची गोडी वाढविणाऱ्या कांदाचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे आहारात त्याचा समावेश करावा असं अनेकदा सांगितलं जातं. परंतु, कांद्याप्रमाणेच कांद्याच्या पातीचेदेखील तितकेच फायदे आहेत. त्यामुळे कांद्याच्या पातीचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

१. कांद्याच्या पातीचं सेवन केल्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.

२. रक्तदाब नियंत्रणात राहतो.

३. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते.

४. हाडे मजबूत होतात.

५. डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं.

६. व्हायरल तापापासून बचाव होतो.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)