News Flash

या आजारांवर दोडका ठरतो रामबाण औषध; जाणून घ्या फायदे

ही भाजी अनेकांना आवडत नाही म्हणूनच याला दोडका हे नाव पडलं असावं.

दोडका, शिराळे, कोशातकी या विविध नावांनी ओळखला जातो. फार पूर्वी रानावनात वेलीवर मिळणाऱ्या दोडक्यांचा. आयुर्वेदात मोठा वापर, उलटी व जुलाबाचे औषध म्हणून केला जात असे. या दोडक्यांची चव कडू असते. बियांचा औषधी उपयोग आहे. दमा, खोकला, कप, अम्लपित्त, पोटदुखी, पोटफुगी या विकारात या बियांचे चूर्ण किंवा काढा उपयुक्त आहे. त्यामुळे प्रथम उलटी होते किंवा नंतर जुलाबाद्वारे कफ बाहेर पडतो.

आज बाजारात उपलब्ध असणाऱ्या गोड दोडक्यातही औषधी गुण भरपूर आहेत. दोडका पथ्यकर भाजी आहे. मधुमेह व स्थौल्य या विकारात दोडका दुध्या भोपळय़ाप्रमाणेच उकडून खावा. पाय दुखणे, मलावरोध, अग्निमांद्य, खडा होणे, पोट फुगणे, उष्णतेशी सतत काम असण्यामुळे येणारा थकवा, लघवी कमी होणे, थोडी थोडी लघवी होणे, तिडीक मारणे या विकारात दोडक्याच्या फोडी, भाजी किंवा रस उपयुक्त आहे. अरुची, खोकला, कप, कृमी व ताप या विकारात दोडका पथ्यकर पालेभाजी आहे. कृश व्यक्तींना वजन वाढविण्याकरिता दोडका उपयुक्त आहे. दोडक्याच्या मुळांचा उपयोग मूतखडा पडून जाण्याकरिता होतो.

पचायला अतिशय हलकी असलेली ही भाजी पथ्याची समजली जाते, कारण त्यात फॅट खूपच कमी असते आणि कॅलरीज जवळजवळ नसतातच. रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासाठी आणि यकृताच्या आरोग्यासाठी दोडका उपयुक्त आहे. दोडक्याच्या सेवनाने मूळव्याध आणि मलावरोध या दोन्ही व्याधीत फायदा होतो. दोडक्याची सालं म्हणजे शिरा फेकू नयेत. कोवळ्या असतील तर बारीक चिरून, शिजवून भाजी करावी किंवा परतून चटणी करावी. नाहीतर एका दोडक्याची सालं आणि एक टोमॅटो उकडून मिक्सरमधून काढून गाळावं आणि त्याचं सार किंवा सूप करावं. आमांश, जुलाब, मंदाग्नी, पोटदुखी या विकारात रुग्णांनी दोडका टाळावा. दोडक्याच्या शिरांची किसून तीळ मिसळून फोडणी देऊन चटणी करावी. दोन घास अन्न जास्त जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2020 2:54 pm

Web Title: health benefits of zucchini nck 90
Next Stories
1 64MP कॅमेरा + 5020 mAh बॅटरी, Redmi चा जबरदस्त स्मार्टफोन आता ‘ओपन सेल’मध्ये करा खरेदी
2 दह्यामध्ये गूळ मिसळून खा… होतील विचारही केला नसेल असे फायदे
3 Facebook Messenger साठी ‘फॉरवर्ड मेसेज’ फीचर, एकावेळी फक्त ‘इतक्या’ जणांनाच पाठवता येणार मेसेज 
Just Now!
X