सध्या सुरू असलेली करोनाची महामारी तसेच येणाऱ्या पावसाळ्याच्या परिस्थितीत योग्य आरोग्य विमा निवडण्याच्या दृष्टीने महत्वाचे असे पाच मुद्दे फ्युचर जनरली इंडिया इन्श्युरन्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर असलेल्या डॉ. श्रीराज देशपांडे यांनी सांगितले आहेत. पावसाळ्यात साचलेले पाणी, आर्द्रता आणि तापमानातील चढ-उतार हे रोग वाढीला कारणीभूत असणाऱ्या जीवाणूंसाठी पोषक वातावरण निर्मिती करतात. यामुळे एन्फ्ल्यूएन्झा, न्युमोनिया, दमा, टायफॉईड, कॉलरा, डेंग्यू, मलेरिया यासारख्या विविध गंभीर संसर्गाचा आणि आजरांचा प्रादुर्भाव वाढतो. अशा प्रकारच्या आरोग्यविषयक धोक्यांपासून आपले रक्षण करण्याच्या दृष्टीने आरोग्य विमा हे एक आर्थिक छत्र ठरू शकते. योग्य आरोग्य विमा निवडण्यासाठी पाच महत्त्वाच्या सूचना-

१) विमाराशीची रक्कम अतिशय हुशारीने निश्चित करा:
वाढीव वैद्यकीय खर्चाचा अंदाज घेऊन पुरेशी रक्कम निवडा.  तुमचे वय, कुटुंबातील एकूण व्यक्ती आणि कुटुंबात आधीपासून असणारे आजार अशा विविध घटकांवर आरोग्य विमा रक्कम अवलंबून असते किंवा तितक्या रकमेची गरज असते. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात ज्या व्यक्ती आरोग्य विमा योजनेच्या शोधात असतात त्यांनी किमान तीन लाख रुपयांचे (भारतीय मूल्यात) आरोग्य कवच घेणे गरजेचे असते. भारतातील बहुतांश कुटुंबे 3 ते 5 लाखांचे आरोग्य कवच घेतात. चौकोनी कुटुंबासाठी किमान १० लाख रुपयांचे आरोग्य कवच घेणे हितावह असते. फॅमिली फ्लोटर पॉलिसीच्या रकमेत संपूर्ण कुटुंबाचे रक्षण समाविष्ट असल्याने जास्त रकमेची हमी देणारा पर्याय निवडावा.

२) रुग्णालयातील खोलीच्या भाड्याची मर्यादा तपासून बघा:
खोली भाड्याची मर्यादा जास्त असणारा किंवा ज्यात खोलीच्या भाड्याची काही मर्यादा नसेल असा पर्याय निवडा, कारण या खोली भाड्याच्या मर्यादेनुसार दाव्याची भरपाई करण्यात येते. जर तुमच्या विम्यानुसार खोलीच्या भाड्याची काही मर्यादा असेल आणि जर तुम्ही यापेक्षा जास्त भाड्याची खोली निवडल्यास या दोन्ही रकमेत जी तफावत असेल तो खर्च तुम्हाला करावा लागेल.

३)उपलब्ध विविध प्रकारच्या विमा कवचांची माहिती करुन घ्या:
रुग्णालयातील खर्चाची काळजी घेतली जावी यासाठी तुमच्याकडे जास्त रकमेची हमी देणारी व्यापक आरोग्य विमा योजना तरी असलीच पाहिजे. याव्यतिरिक्त, तुमच्या उत्पन्न क्षमतेचे रक्षण करण्याच्या दृष्टीने तुम्ही गंभीर आजार लाभ उत्पादने खरेदी करू शकता. विशिष्ट आजारांसाठी कवच देऊ करणाऱ्या अनेक आरोग्य विमा योजना आज बाजारात उपलब्ध आहेत. पावसाळ्यात डास चावल्याने होणाऱ्या आजारांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तुम्ही वेक्टर सॅशे उत्पादनांचा पर्याय निवडू शकता. या योजनांमधील सर्वात मोठा फायदा म्हणजे यावरील हप्ता परवडणारा असतो. जर तुमच्याकडे सामान्य आरोग्य विमा योजना असेल तरी देखील तुम्हाला अतिरिक्त कवच म्हणून विशिष्ट योजना घेण्याचा विचार करता येऊ शकतो.

४)उत्पादनाची वैशिष्ट्ये काळजीपूर्वक तपासून बघा:
स्वाक्षरी करण्यापूर्वी, उत्पादनाची/योजनेची वैशिष्ट्ये नीट समजून घेतली पाहिजेत. कोणत्याही सामान्य योजनेत पुढील बाबींचा समावेश असणे गरजेचे आहे: 1) रुग्णालयात भरती होणे (हॉस्पिटलायझेशन) (2) कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय गंभीर आजारावरील उपचारासाठी शस्त्रक्रिया (3) उपचार आणि औषधांवरील खर्च. विशिष्ट गरजा आणि कौटुंबिक इतिहास यानुसार विमा कवचाची रक्कम ठरविण्यातील लवचिकता उत्पादनाने दिली पाहिजे. हमी रकमेच्या कमाल 100% एकत्रित लाभांश (बोनस) देऊ करणारी अनेक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत.

५) कॅशलेस सुविधेची उपलब्धता तपासून बघा:
सद्य परिस्थिती लक्षात घेता, विमा देऊ करणारी कंपनी कॅशलेस सुविधा देऊ करते आहे की नाही याची खातरजमा आरोग्य विमा योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी करुन घेणे अत्यावश्यक आहे. तुमच्या विमा कंपनीच्या नेटवर्क रुग्णालयांमध्ये तुम्हाला वैद्यकीय उपचार मिळण्याची सुविधा कॅशलेस सेवेद्वारे मिळते आणि यासाठी