चेहरा हा प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. सर्वांसमोर आपण चांगले दिसावे असे सगळ्यांनाच वाटत असते. मग यासाठी कधी सौंदर्यप्रसाधनांचा वापर तर कधी पार्लरची वाट धरली जाते. पण हे उपाय तेवढ्यापुरते उपायकारक असतात. मात्र चेहरा दिर्घकाळासाठी चांगला व्हावा असे वाटत असेल तर घरच्या घरी आपल्या स्वयंपाकघरात असणाऱ्या पदार्थांपासून फेसपॅक तयार करता येतात. यामध्ये रसायने नसल्याने चेहऱ्याच्या त्वचेला कोणतीही इजा होण्याची शक्यता नसते. तसेच या पॅकमधून त्वचेला जीवनसत्त्वे, खनिजे, अँटीऑक्सिडंटस मिळतात. पाहूयात असेच काही सहज करता येतील असे सोपे फेसपॅक

हळदी (Turmeric)
हळदीमध्ये एन्टी-बॅक्टीरियल (Anti Bacterial) पोषक तत्वे असल्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो. तसेच चेहऱ्यावरील डार्क सर्कल्स दूर करण्यासही मदत होते. शिवाय हळधीमधील नैचुरल एंटीसेप्टिकमुळे चेहरा आणखी जास्त उजळतो. मुलतानी माती हळदीबरोबर लावल्याने चेहऱ्याचा ग्लो वाढतो. हा पॅक बनविण्यासाठी मुलतानी माती, हळद आणि चंदन पावडर हे दुधामध्ये एकत्र करावे. चेहरा आणि मानेला हे मिश्रण लावून नंतर चेहरा धुवून टाकावा.

बेसन (Gram Flour)
बेसन पीठ स्क्रबसारखं चेहऱ्याला लावावे. यामुळे त्वचा मऊ व स्वच्छ होण्यास मदत होते. तसेच त्वचेला होणारे विविध इन्फेक्शनही नाहिसे होतात.

दूध (Milk) –
दूध हे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. त्याचप्रमाणे त्वचेसाठीही त्याचा चांगला उपयोग होतो. दुधात असणाऱ्या लॅक्टीक अॅसिडचा त्वचेसाठी चांगला फायदा होतो. २ चमचे साखर आणि १ चमचा दूध घेऊन त्याचे मिश्रण बनवावे. मग हे मिश्रण चेहऱ्यावर चोळावे. त्यानंतर १० मिनिटांनी चेहरा धुवून टाकावा. असे करायचे नसल्यास कापसाचा बोळा या मिश्रणात भिजवून चेहरा पुसून काढल्यास त्याचाही चांगला फायदा होतो.

काकडीचा फेसपॅक –
काकडीमुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो. कोरड्या त्वचेची समस्या असणाऱ्या महिलांसाठी काकडीपासून तयार करण्यात आलेला फेसपॅक अत्यंत उपयुक्त ठरतो. काकडीचा रस त्वचेचा कोरडेपणा दूर करतो. याशिवाय काकडी त्वचेची जळजळ शांत करण्यात मदत करते. त्वचेवरील फुगवटा कमी करते.त्यामुळे काकडीचा फेसपॅक लावणं कधीही उत्तम. अर्धी काकडी चांगली किसून त्यात दोन चमचे साखर घ्याला. हे मिश्रण फ्रिजमध्ये गार होईपर्यंत ठेवा. त्यानंतर चेहऱ्याला लावून काही मिनिटांनी मालिश करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. आठवड्यातून दोनदा हा फेसपॅक वापरा. त्यामुळे त्वचेवर जमा झालेला मळ दूर होईल तसेच कोरड्या त्वचेची समस्याही दूर होईल.

केळ्यांचा फेसपॅक – केळ्यामध्ये आरोग्यासाठी फायदेशीर अनेक गुणधर्म असतात. तसेच केळी त्वचेसाठी आरोग्यदायी ठरतात. यासाठी एक केळ घेऊन त्यात ऑलिव्ह ऑइल आणि मध एकत्र करून फेसपॅक तयार करा. हे मिश्रण १५-२० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचेतील कोरडेपणा दूर होतो.

टोमॅटो-मध फेसपॅक – चेहऱ्याच्या सुंदरतेसाठी दोन चमचे टोमॅटो रस आणि अर्धा चमचा मध एकत्रित करून हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. २० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. यामुळे चेहरा उजळ दिसेल.