इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये आज वाय-फाय राउटर सर्वात लोकप्रिय डिव्हाइसेसपैकी एक आहे. घरामध्ये अथवा कार्यालयात इंटरनेच कनेक्शन घेण्यासाठी राउटर घेतला जातो. मात्र, अशावेळी राउटरची निवड कशी करावी याबाबत अनेक प्रश्न पडतात. याच प्रश्नाची उत्तरे जाणून घेणार आहोत.

वायफाय राउटर निवडताना सर्वप्रथम इंटरनेटचा वापर नेमका कोणकोणत्या कामांसाठी करतो हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. राउटरची निवड करत असताना आपल्याला त्यावर बँड दिसतात. यामध्ये २.४ आणि ५ गीगाहर्ट्झ बँड नमूद केलेले दिसते. म्हणजे त्या प्रमाणात आपल्याला वायररहित जोडणी उपलब्ध होणार आहे. ८०२.११ बी आणि जी उपकरणांसाठी २.५ गीगाहर्ट्झचे राउटर उपयुक्त ठरते. तर ८०२.११एम उपकरणांसाठी २.४ आणि ५ गीगाहर्ट्झचे राउटर लागते. मात्र ८०२.११एसीसाठी केवळ ५ गीगाहर्ट्झचे राउटर लागते.

wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Loksatta kutuhal Application of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीचे उपयोजन
Before blaming diabetes drugs understand What chemicals are used in medicines
मधुमेहावरल्या औषधांना दोष देण्याआधी समजून तरी घ्या…
bhang uses
विश्लेषण : भांगेचे ‘हे’ गुणकारी फायदे माहीत आहेत का?

५ गीगाहर्ट्झचे राउटर हे २.४ गीगाहर्ट्झच्या तुलनेत जास्त उपकरणांना किंवा अधिक जलद इंटरनेट जोडणी पुरवू शकते. मात्र या दोन्ही राउटर्समध्ये सतत इंटरनेट जोडणी पुरवण्याची क्षमता नसते. यामुळे बरेच तास इंटरनेट जोडणी पुरविल्यानंतर काही सेकंदासाठी ती खंडित होते. तुम्हाला जर सिंगल बँड इंटरनेट जोडणी हवी असेल तर तुम्ही २.४ किंवा ५ गीगाहर्ट्झचे राउटर घेऊ शकता. मात्र डय़ुएल बँडसाठी तुम्हाला ५ गीगाहर्ट्झचे राउटरच घेणे क्रमप्राप्त आहे. तसेच राउटरची जागा ठरविताना संपूर्ण घरात किंवा कार्यालयात रेंज येईल अशा प्रकारे ठेवणे फायदेशीर ठरले. एवढे करूनही काही उपकरणांवर इंटरनेट चालत नाही. अशा वेळी उपकर कोणती वायफाय जोडणी स्वीकारणार हे लक्षात घ्यावे लागते. वायफाय राउटरचे जागतिक प्रमाण हे ८०२.११ एन असे आहे. यापूर्वीचे व्हर्जन हे ८०२.११एन ड्राफ्ट असे होते. यामुळे राउटर खरेदी करताना ही काळजी घेणेही गरजेचे आहे.

केवळ घरगुती वापरासाठी किंवा लघुउद्योगांसाठी जर राउटर्स आवश्यक असतील तर ते सिंगल बँड असले तरी उपयुक्त ठरतात. जर तुम्हाला इंटरनेट गेमिंग किंवा मल्टिमीडिया वापर करायचा असेल तर तुम्हाला डय़ुएल बँड राउटरची गरज पडेल. याचबरोबर जोडणीचा वेगही पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरते. १५० एमबीपीस, ३०० एमबीपीस, ९००एमबीपीस.. असे क्रमांक तुम्हाला वायफाय राउटर खरेदी करताना दिसतील. याचा अर्थ हे राउटर जास्तीतजास्त इतका वेगाने इंटरनेट पुरवू शकणार आहे. यामुळे राउटर घेताना नेहमीच जास्त वेगक्षमता असलेले राउटर घेणे फायदेशीर ठरते.

याचबरोबर आपल्या घरातील इंटरनेट जोडणीतून किती वेग मिळतो हेही तपासणे गरजेचे ठरते. नाहीतर मूळ वेग कमी असतानाच जास्त वेगाचे राउटर घेऊन काही फायदा होणार नाही. अनेक ई-बाजार संकेतस्थळांवर १७५० एमबीपीस आणि १९०० एमबीपीसचे राउटर्सही मिळतात. राउटरची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची असते. यामुळे नवीन तंत्रज्ञानावर आधारित सर्वच राउटर आपल्याला उच्च दर्जाची सुरक्षा पुरवीत असले तरी खरेदी करत असलेले राऊटर ‘डब्लूपीए २’ आधारित आहे हे तपासून घ्या.