24 April 2019

News Flash

ह्युंदाईच्या सँट्रोने तोडले रेकॉर्ड; २२ दिवसांत २८ हजारांहून अधिक बुकींग

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशभरातून १,२९,५०० जणांनी या कारसाठी चौकशी केली आहे

ह्युंदाई कंपनी वेगवेगळ्या कार लाँच करण्यात आघाडीवर आहे. नुकतीच कंपनीने आपली सेंट्रोला कार लाँच केली होती. या कारला ग्राहकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत असून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. २ दिवसांपुर्वी या कारचे बुकिंग सुरू झाले होते. आता २२ दिवसांत नव्याने लाँच झालेल्या कारचे किती बुकींग व्हावे? तर नव्याने लाँच झालेल्या ह्युंदाईच्या सँट्रोचे २२ दिवसांत २८,८०० बुकींग झाले आहेत. त्यामुळेच ह्युंदाईने यावर्षातील ऑक्टोबर महिन्यात सर्वात जास्त विक्रीचा आकडा गाठला आहे. ऑक्टोबर महिन्यात ह्युंडाईने ५२ हजारहून अधिक कार विकल्या होत्या. ह्युंदाई सेंट्रोला अगदी सुरूवातीपासून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

सुरुवातीला अवघ्या ९ दिवसांत १४ हजार लोकांनी ही गाडी बुक केली. तर लाँचिंगपर्यंत २३,५०० लोकांनी बुक केलं आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशभरातून १,२९,५०० जणांनी या कारसाठी चौकशी केली आहे. आपल्या नियोजनानुसार कंपनी दर महिन्याला १० हजार कारची निर्मिती करणार आहे. आता इतक्या मोठ्या प्रमाणात बुकींग झाली असली तरीही ही कार प्रत्यक्ष हातात येण्यासाठी त्यांना एक ते दोन महिने वाट पहावी लागणार आहे. या कारची किंमत ३.८९ लाख इतकी असल्याने ती उच्चमध्यम वर्गातील लोकांना परवडणारी आहे. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर या गाडीला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाल्याचे चित्र आहे.

First Published on November 7, 2018 6:11 pm

Web Title: hyundai santro 28800 booking in only 22 days