News Flash

72 तासांत पाच लाख डाउनलोड, लाँच होताच व्हायरल झालं हे Made in India अ‍ॅप

काही दिवसांपूर्वीच लाँच झालेलं एक अ‍ॅप सध्या चांगलंच लोकप्रिय ठरतंय

भारत-चीनमध्ये सीमेवर सुरू असलेल्या संघर्षामुळे चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी भारतात जोर धरत आहे. अशातच मोबाइलमधील चिनी अ‍ॅप्सनाही विरोध होतोय. चिनी अ‍ॅप्सना पर्याय म्हणून गेल्या दोन महिन्यांमध्ये बरेच मेड इन इंडिया अ‍ॅप लाँच झालेत, पण काही दिवसांपूर्वीच लाँच झालेलं एक अ‍ॅप सध्या चांगलंच लोकप्रिय ठरतंय.

रोपोसो (Roposo), मित्रों (Mitron) आणि बोल इंडिया (Bolo Indya) या अ‍ॅप्सनंतर आता Chingari नावाचं एक मेड इन इंडिया अ‍ॅप लाँच झालं आहे. विशेष म्हणजे लाँच झाल्यांनतर अवघ्या तीन दिवसांमध्येच या अ‍ॅपला पाच लाखांहून अधिक युजर्सनी डाउनलोड केल्याचा दावा ‘चिंगारी’च्या डेव्हलपर्सकडून करण्यात आला आहे. चिनी अ‍ॅप टिकटॉकला पर्याय असलेलं ‘चिंगारी’ अ‍ॅप बंगळुरूच्या बिस्वात्मा नायक आणि सिद्धार्थ गौतम यांनी बनवलं आहे.

‘गेल्या 72 तासांमध्ये आमचं अ‍ॅप जवळपास पाच लाख जणांनी डाउनलोड केलं. चिंगारीचं कुटुंब हळूहळू मोठं होतंय’, असं डेव्हलपर विश्वात्मा नायक आणि सिद्धार्थ गौतम यांनी म्हटलं आहे. लाँच झाल्याच्या 36 तासांमध्येच Chingari अ‍ॅप गुगल प्ले-स्टोअरच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये आलं होतं असा दावाही त्यांनी केला. हिंदी, इंग्रजीसह हे अ‍ॅप 10 भाषांमध्ये उपलब्ध आहे.

प्ले-स्टोअरवर दिलेल्या माहितीनुसार, चिंगारी अ‍ॅपद्वारे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवू शकतात आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअरही करु शकतात. यामध्ये ट्रेंडिंग न्यूज, मनोरंजन, फनी व्हिडिओ, लव स्टेटसचे व्हिडिओ मिळतील. चिंगारीवर शेअर केलेल्या पोस्टवर लाइक, कॉमेंट, शेअर करता येतील. व्हॉट्सअपवर शेअर करण्यासाठी वेगळा पर्याय आहे. एखाद्या युजरला फॉलो करण्याचाही पर्याय यामध्ये देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 3:14 pm

Web Title: indias tiktok rival chingari is apparently off to a blazing start 5 lakh downloads in just 72 hours claims developers sas 89
Next Stories
1 कमी झोपणाऱ्यांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण अधिक; संशोधक म्हणतात, “झोपेचा थेट संबंध मानसिक आरोग्याशी”
2 चार कॅमेऱ्यांचा Oppo A9 2020 झाला स्वस्त, किंमतीत झाली भरघोस कपात
3 Vodafone च्या प्रीपेड युजर्ससाठी भन्नाट ऑफर, ‘या’ प्लॅनवर मिळतोय फ्री 5GB एक्स्ट्रा डेटा
Just Now!
X