international womens Day 2019 : सोशल मीडियावर पहिल्यांदाच दाखल झालेल्या मासिक पाळीबद्दलच्या इमोजीला स्त्रियांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ४७% स्त्रिया असे म्हणत आहेत की, या इमोजीमुळे त्यांना मासिक पाळीबद्दल अधिक उघडपणे बोलता येईल. स्त्रियांच्या मनातल्या गुजगोष्टींना, त्यांच्या इच्छा-आकांक्षा, महत्त्वाकांक्षांना संवादाचे खुले आकाश मिळावे यासाठीच्या उपक्रमांमध्ये या इमोजीला गणले जात आहे.

मासिक पाळी किंवा पिरियड इमोजी हे त्याविषयीच्या संवादाचे प्रतीक आहे. जगातल्या एकूण लोकसंख्येपैकी अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्येचे प्रत्यक्ष जीवनानुभव या इमोजीमधून व्यक्त होतील. स्त्रियांच्या शारीरिक, आरोग्यविषयक समस्यांवर अधिक गंभीरपणे चर्चा होईल. खरेतर ही इमोजी सोशल मीडियावर यायला बराच उशीर झाला आहे. याबाबतीतल्या सोशल मीडियावरील संवादामध्ये भारतीय बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधू सारखे अनेक सेलिब्रेटीज बऱ्याच काळापासून आपापली भूमिका मांडत आहेत.

मासिक पाळीकडे बघण्याचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलला आहे. आजच्या आधुनिक मुली व स्त्रिया पीरियड्सबद्दल न डगमगता बोलतात, युट्युबवर आपले अनुभव सांगतात, सल्ले देतात. गेल्या वर्षी पी व्ही सिंधुच्या मुलींना उद्देशून लिहिलेल्या, प्रगतीची स्वप्ने #dreamsofprogress इतरांसमोर मोकळेपणाने मांडण्याचे आवाहन करणाऱ्या खुल्या पत्राला ग्राहकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला होता. देशभरातील मुलींनी सिंधूच्या या आवाहनाला साथ दिली. कितीतरी मुलींनी आपली स्वप्ने व महत्त्वाकांक्षा सांगितल्या आणि त्या पूर्ण करण्याच्या मार्गात मासिक पाळीचा अडसर येऊ नये अशी इच्छादेखील व्यक्त केली. पी. व्ही. सिंधूने फक्त तिचा स्वतःचा अनुभव सांगितला आणि तिच्या रूपाने युवा मुलींना त्यांची व्हर्च्युअल गुरु भेटली.

एकीकडे मुली, महिला मासिक पाळीबद्दल कोणताही आडपडदा न मोकळेपणाने बोलू लागल्या आहेत तर त्याचवेळी पुरुषदेखील अधिकाधिक समजूतदारपणे या संवादात सहभागी होताना दिसत आहेत. याच विषयावरील खऱ्याखुऱ्या जीवनकथेपासून प्रेरणा घेऊन बनवलेला अक्षय कुमारचा पॅडमॅन हा सिनेमा याचे उत्तम उदाहरण आहे. मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर संवादाला चालना देण्यात या सिनेमाने मोलाची भूमिका बजावली.

मासिक पाळीबद्दलचा संवाद हा पारंपरिक गैरसमजुती, रूढी, परंपरा यापासून दूर जात स्त्रीत्वापर्यंत येऊन पोहोचला आहे. बराच दीर्घ पल्ला गाठला असला तरी अजूनही खूप काही करणे शिल्लक आहे. या महिला दिनाच्या निमित्ताने आपण अशी काही उचलली पाहिजेत जेणेकरून मासिक पाळीमुळे मुलींच्या, महिलांच्या शिक्षणात किंवा नोकरी, व्यवसायात काही अडचणी येणार नाहीत. वंचित वर्गातील महिलांना सॅनिटरी उत्पादने उपलब्ध करवून देऊन त्यांच्यासाठी मोठी सुविधा निर्माण केली जाऊ शकते. सोशल मीडिया यासंदर्भात लक्षणीय पावले उचलत आहे.