03 August 2020

News Flash

कमी झोपणारी कुमारवयीन मुले होतात जाड!

कुमारवयीन मुले कमी झोपत असतील, तर त्यांची शरीरयष्टी स्थूल होण्याची शक्यता अधिक असते, असे न्यूझीलंडमध्ये झालेल्या संशोधनात आढळून आले.

| September 23, 2013 12:08 pm

कुमारवयीन मुले कमी झोपत असतील, तर त्यांची शरीरयष्टी स्थूल होण्याची शक्यता अधिक असते, असे न्यूझीलंडमध्ये झालेल्या संशोधनात आढळून आले. मात्र, त्याचवेळी कुमारवयीन मुली जर कमी झोपत असतील, तर त्यांच्या शरीरयष्टीवर त्याचा कोणताही परिणाम होत नाही, असेही संशोधकांना आढळले.
न्यूझीलंडमधील ओटॅगो विद्यापीठातील पोषण आहारशास्त्र विषयातील संशोधकांनी या विषयावर संशोधन केले. १५ ते १८ वयोगटातील मुले जर कमी झोपत असतील, तर ते जाड होण्याची शक्यता असते. त्याचवेळी याच वयोगटातील मुली कमी झोपत असतील, तर त्यांच्या शरीरावर कोणताही परिणाम होत नाही, असे आढळून आले.
एकूण ३८६ मुलांच्या आणि २९९ मुलींच्या झोपण्याच्या सवयी, त्यांची उंची, वजन आणि शरीरावरील चरबीचे गुणात्मक प्रमाण यांचा अभ्यास संशोधकांनी केला. मुलांमध्ये झोपेचा आणि शरीरयष्टीचा परस्पर संबंध असतो. त्याचवेळी मुलींमध्ये अशाप्रकारचा कोणताही संबंध नसतो, असे संशोधनाच्याशेवटी आढळल्याचे प्रमुख संशोधिका डॉ. पाऊला स्किडमोर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2013 12:08 pm

Web Title: lack of sleep can make teen boys fat study
टॅग Lifestyle,Sleep
Next Stories
1 ८ तासांपेक्षा जास्त काम करणा-यांना हृदयरोगाचा धोका
2 सोशल मिडियावर जास्तवेळ म्हणजे स्मृतिभ्रंशाला आमंत्रण!
3 मोबाईल आणि कॅन्सरचा संबंध नाही
Just Now!
X