जवळपास वर्षभरानंतर स्मार्टफोन निर्माती कंपनी लिनोवोने (Lenovo)दोन नवे स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केले आहेत. Lenovo K9 आणि Lenovo A5 हे स्मार्टफोन कंपनीने लॉन्च केले असून दोन्ही बजेट फोन आहेत. Lenovo K9 ची किंमत 8,999 रुपये आणि Lenovo A5 ची किंमत 5,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे दोन्ही फोन फ्लिपकार्ट या संकेतस्थळावर विक्रीसाठी उपलब्ध असतील.

Lenovo K9 चे फिचर्स –
Lenovo K9 मध्ये 5.7 इंच फुल स्क्रीन डिस्प्ले आहे. फोनमध्ये 2.0 गीगाहर्ट्ज ऑक्टाकोर प्रोसेसर आणि 3 GB रॅम आहे. हायब्रिड ड्युअल सिम असलेल्या या स्मार्टफोनची इंटरनल मेमरी 32 GB असून मायक्रोएसडी कार्डद्वारे मेमरी 128 जीबीपर्यंत वाढवता येईल. फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनच्या पुढील आणि मागील दोन्ही बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. रिअर कॅमेऱ्याबाबत सांगायचं झाल्यास एक कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे, तर दुसरा कॅमेरा 5 मेगापिक्सल आहे. याशिवाय सेल्फीकॅमेऱ्याबाबत सांगायचं झाल्यास, पहिला कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आणि दूसरा कॅमेरा 5 मेगापिक्सलचा आहे. दोन्ही बाजूला फ्लॅश सपोर्टही आहे. फोनमध्ये 3000 mAh ची बॅटरी आहे. फेस अनलॉक फीचर आणि फिंगरप्रिंट सेंसर देखील फोनमध्ये आहे.

Lenovo A5 फिचर्स –
Lenovo A5 मध्ये 5.45 इंच फुल स्क्रीन डिस्प्ले आहे. 1.3G गीगाहर्टज ऑक्टाकोर प्रोसेसर असलेला हा स्मार्टफोन 2 GB आणि 3 GB रॅम या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. फोनमध्ये 13 MP चा AI मुख्य कॅमेरा आणि 8 MP चा सेल्फी कॅमेरा आहे. फेस अनलॉक फिचर आणि फिंगरप्रिंट सेंसर हे फिचर देखील आहेत. 2 GBरॅम/ 16 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 5,999 रुपये आणि 3 GB रॅम/ 32 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 6,999 रुपये आहे. दोन्ही व्हेरिअटंची मेमरी मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येईल. फोनमध्ये 4000mAh ची पावरफुल बॅटरी आहे.