28 February 2020

News Flash

सेल्फ सव्‍‌र्हिस : एलईडी टीव्हीची देखभाल

अधिक वेळ टीव्ही चालू ठेवू नका. सतत टीव्ही चालू राहिल्यास तो खराब होऊ शकतो.

(संग्रहित छायाचित्र)

सध्या अनेकांच्या घरात एलईडी टीव्ही आहेत. सुस्पष्ट चित्र, ऊर्जाबचत आणि कमी जागा व्यापत असल्याने एलईडी टीव्हीला अनेकांची पसंती आहे. मात्र या टीव्हीची योग्य प्रकारे काळजी घेणेही आवश्यक आहे.

* एलईडी टीव्ही शक्यतो भिंतीवर अडकवा. भिंतीवर अडकवताना मात्र तो घट्ट बसला आहे की नाही हे तपासून पाहा. घट्ट नसेल तर तो खाली पडण्याची शक्यता असते.

* एलईडी टीव्हीवर साचलेली धूळ नियमित साफ करणे आवश्यक आहे. टीव्हीवर धुळीचे पुट्टे साचल्यास तो खराब होण्याची शक्यता असते. धुळीमुळे टीव्हीवरील चित्र अस्पष्ट दिसते.

* मायक्रोफायबर कापडाचा वापर करून टीव्ही साफ करावा. अनेक जण वृत्तपत्र, अन्य कागद आणि जुन्या कापडाने टीव्ही पुसतात. ते चुकीचे आहे.

* टीव्ही साफ करताना रासायनिक द्रव्याचा वापर करू नका. पाण्याचाही वापर शक्यतो करू नका.

* अधिक वेळ टीव्ही चालू ठेवू नका. सतत टीव्ही चालू राहिल्यास तो खराब होऊ शकतो.

* पावसाळय़ात विजांचा कडकडाट होत असेल, तर टीव्ही शक्यतो बंद ठेवावा.

* टीव्ही बंद करताना थेट विद्युतपुरवठा बंद करू नये. आधी रिमोट कंट्रोलद्वारे टीव्ही बंद करावा आणि त्यानंतर वीजपुरवठा बंद करावा.

First Published on July 5, 2018 3:08 am

Web Title: maintenance tips for led televisions
Next Stories
1 न्यारी न्याहारी : गोड आप्पे
2 पानापानांतला पाऊस
3 सेल्फीस कारण की..
Just Now!
X