संक्रातीची चाहूल लागताच आठवते ती भोगीची भाजी, बाजरीची भाकरी, गूळपोळी आणि तिळाचे लाडू. विविध भाज्या एकत्र करून केलेली भोगीची भाजी संक्रातीचे विशेष आकर्षण. तोंडाला पाणी सुटवणारी ही भाजी आरोग्यासाठीही तितकीच फायदेशीर आहे. या चविष्ट भाजीसोबत तिळ लावलेली बाजरीची भाकरी असेल तर मजाच निराळी असते. परंतु अनेक लोकांना ही भाजी कशी तयार करावी हे माहीती नाही. यासाठी आज आम्ही तुम्हाला चविष्ट भाजीची रेसिपी सांगणार आहेत.

साहित्य : वांगी – तीन, वर्णे – अर्धी वाटी, ताजे मटार – अर्धी वाटी, हिरवे हरभरे – अर्धी वाटी, भिजवलेले कच्चे शेंगदाणे – अर्धी वाटी, चिरलेली गाजरं – दोन, चिरलेला कांदा झ्र् एक, तीळ – एक टेबल स्पून, खोवलेलं ओलं खोबरं – अर्धी वाटी, चिरलेली कोथिंबीर – पाव वाटी, तिखट – दोन चमचे, मीठ – चवीनुसार, हळद, हिंग – प्रत्येकी अर्धा चमचा, तेल – पाव वाटी, गूळ – दोन चमचे, गरम मसाला पावडर – एक चमचा

Loksatta sanvidhan bhan Constitution Fundamental rights equal protection
संविधानभान: जनमते मानुस होत सब..
How to Make Cabbage Vada Recipe summer food
चिरलेला कोबी- वाटीभर बेसन, या विकेण्डला घरीच करा कुरकुरीत कोबीचे वडे, चविष्ट रेसिपी-आवडेल सर्वांना
idli or dosa batter is never over-fermented
World Idli Day : इडली स्वादिष्ट व्हावी म्हणून पीठ जास्त दिवस आंबवता का? ही सवय आताच थांबवा….
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….

Makar Sankranti २०२० : जाणून घ्या.. मकरसंक्रांतीचा मुहूर्त, पूजेचा विधी आणि सणाचे महत्त्व

कृती : वांगी, गाजरं चिरून घ्या. सर्व भाज्या एकत्र करा. भांडय़ात तेल तापवा, त्यात कांदा परतून घ्या. हिंग, हळद घाला. भाज्या घालून छान परतून घ्या. तिखट, मीठ, गरम मसाला पावडर, तीळ, खोबरं घालून छान एकजीव करा. गूळ घाला. गरजेनुसार पाणी घालून शिजवून घ्या. शेवटी कोथिंबीर घाला.भोगीच्या दिवशी ही भाजी करतात.बाजरीची भाकरी, चटणी, मेथीच्या भाजीसोबत ही भाजी नैवेद्यासाठी करतात.

भोगीचं महत्व माहित आहे का?

भोगीच्या भाजीचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व –

हरभरा : भाजलेले व तळलेले हरभरे कफ-पित्तनाशक असतात तर भिजवलेले हरभरे बलदायक व रुचकर असतात. हरभऱ्यात १७.१ ग्रॅम प्रथिने, २.७ ग्रॅम खनिजे, ६१.२ ग्रॅम कबरेदके आणि ५.३ ग्रॅम स्नेह असतो.

मटार : मटार शिजवून खाल्ले तर बलदायकअसतात. मात्र कच्च्या मटारांनी जुलाबाची शक्यता जास्त असते. यामध्ये २३ ग्रॅम प्रथिने, ५४ ग्रॅम कबरेदक आणि एक ग्रॅम स्नेह असतो.

गाजर: गाजर उष्ण असून भूक वाढवण्यास मदत करतात. वातनाशक असतात. कफाचे आजार, मूळव्याध, ग्रहणी या विकारांत उपयुक्त आहेत. गाजर वाफेवर शिजवावे. छोटी गाजरे जास्त उपयुक्त ठरतात. गाजराने सूत्रकृमी मरतात, मासिक पाळीत रक्तस्राव व्यवस्थित होत नसल्यास गाजराचा वापर करावा. गर्भिणींनी टाळावा. गाजरे लघवीचे प्रमाण वाढवतात. गाजरात अ जीवनसत्त्वाचे प्रमाण अधिक आहे.

घेवडा : घेवडा वातनाशक असतो, मधुमेह, किडनीचे आजार असणाऱ्यांसाठी उत्तम. लघवीचे प्रमाण वाढवतो. यामध्ये २५ ग्रॅम प्रथिने, ४० ग्रॅम कबरेदके आणि एक ग्रॅम स्नेह असतो.

वांगी : छोटी वांगी कफ-पित्तनाशक असतात तर मोठी वांगी पचायला जड व पित्तकारक असतात. या ऋतूत मोठय़ा वांग्यांचे भरीतही उत्तम पचते. वांग्यातून २५ किलो कॅलरी ऊर्जा, ५.८८ ग्रॅम कबरेदके आणि नऊ मिलिग्रॅम कॅल्शियम मिळते.

शेवग्याच्या शेंगा : या उष्ण असून कफ-वातनाशक आहेत, डोळ्यांना हितकर, कृमिनाशक असून लघवीचे प्रमाण वाढवतात. यांच्या बियांमध्ये ३६ र्निगध स्वच्छ तेल असते. जे स्निग्धता टिकवून ठेवते.