डॉ.अमोल देशमुख

सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर म्हणजेच मनोकायिक आजार किंवा मनोशारीरिक आजार होय. या त्रासाने ग्रस्त व्यक्ती विविध प्रकारची शारीरिक लक्षणे सांगतो. मात्र वैद्यकीयदृष्टय़ा लक्षणे कोणताही शारीरिक आजार असल्याची शक्यता सांगत नाही. सर्व शारीरिक तपासण्या, रक्ताच्या आणि इतर तपासण्या (सिटी स्कॅन/ एमआरआय) करूनही कुठलाही शारीरिक आजार असल्याचे लक्षात येत नाही. अशा प्रकारची लक्षणे तणावाशी निगडित असतात आणि सततच्या तणावामुळे ती टिकून राहतात किंवा वाढत जातात. हा आजार सामान्यत: आयुष्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दशकात सुरू होतो. विशेषत: महिलांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे.

Shukra Gochar 2024
हनुमान जयंतीनंतर या ६ राशींचे नशीब चमकणार! मेष राशीमध्ये होणार शुक्राचे गोचर, नोकरदारांचे चांगले दिवस येणार
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : २४ तासांमध्ये पालटणार ‘या’ राशींचे नशीब, एका महिन्यात मिळणार भरघोस पैसा अन् यश

मनोशारीरिक आजार किंवा सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर पुढील क्लिनिकल वैशिष्टय़ांद्वारे दर्शविला जातो. कोणताही शारीरिक आजार नसतानाही अनेक शारीरिक आजारासारखी लक्षणे असणे, शारीरिक लक्षणे वारंवार येणारे आणि टिकून राहणारे असतात. लक्षणे अस्पष्ट आणि विविध अवयवांसंबंधित असतात, तर कधीकधी नाटय़मयपणे सादर केले जातात. सामान्यत: लक्षणांमध्ये डोकेदुखी, पचनसंस्थेविषयक समस्या समाविष्ट असतात (उदा. ओटीपोटात वेदना, मळमळ, उलटय़ा) घसा दुखणे, खाज सुटणे, लैंगिक आणि मासिक पाळीच्या तक्रारी, पाठ-कंबर दुखणे, थकल्यासारखे वाटणे, दातखीळ बसणे.

मज्जासंस्थेशी निगडित लक्षणे म्हणजे हातापायाला मुंग्या येणे, चक्कर येणे, बोलता न येणे, एखादी गोष्ट दोन दोन दिसणे, आंधळेपणा, झटके येणे, बेशुद्ध पडणे, भास होणे, स्मृती हरवणे असलेली लक्षणे ही शारीरिक आजाराची नाहीत. असे विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी समजावून सांगूनही त्यावर ग्रस्त व्यक्तीचा विश्वास बसत नाही. वैद्यकीय अहवाल सामान्य असूनही त्यावर विश्वास बसत नाही आणि त्यातून सतत डॉक्टर बदलत राहणे, सतत तपासण्या करणे असे आढळून येते. त्यामुळे व्यक्तीचे सामाजिक आणि कौटुंबिक नुकसान होत असते. तात्पुरत्या वैद्यकीय उपचाराने थोडा वेळ बरे वाटू शकते. परंतु तो त्रास पूर्णपणे व नेहमीसाठी कमी होत नाही.

अशावेळी आपण सहज म्हणतो की, जर वैद्यकीय चाचण्या सामान्य आहेत तर नक्कीच काहीतरी बाहेरच आहे. आता हे बाहेरचे म्हणजे कुणीतरी आपल्यावर करणी केली आहे, काळी जादू आहे, भूतबाधा झाली आहे किंवा नशिबाला दोष देतो. त्यातूनच आपण बऱ्याच अयोग्य अशा अंधश्रद्धेच्या मार्गाकडे वाटचाल करतो. हे अयोग्य मार्ग आपली मूळ समस्या तर सोडवत नाही, याउलट समस्यांमध्ये वाढ होते. हा आजार होण्यामागे जैविक, मानसशस्त्रीय तसेच सामाजिक घटक कारणीभूत असतात. मेंदूतील रासायनिक बदल, अनुवंशिकता, स्वभाव, ताणाला सामोरे जाण्याची क्षमता आणि पद्धत, मानसिक प्रतिकार क्षमता, वैवाहिक, कौटुंबिक समस्या अशा बऱ्याच बाबी कारणीभूत असतात.

मनोशारीरिक आजार म्हणजेच सोमॅटोफॉर्म डिसऑर्डरवरील उपचाराची उद्दिष्टे लक्षणे नियंत्रित करणे आणि व्यक्तीची कार्यक्षमता वाढवन्यासाठी त्यास मदत करणे आहे. मानसोपचार तज्ज्ञाच्या मदतीने या आजारावर उपचार करणे शक्य आहे. त्यांच्याशी संपर्क साधून नियमित भेटणे गरजेचे आहे. योग्य औषधोपचार आणि समुपदेशन/ सायकोथेरेपी व्यक्तीची विचारसरणी आणि वागणूक बदलण्यात मदत करू शकते. तसेच वेदना किंवा इतर लक्षणांचा सामना करण्यासाठी, ताणतणावाचा सामना करण्यास आणि कार्यक्षमता सुधारण्यास मदत करू शकते. त्यामुळे लवकर निदान, स्वीकार आणि योग्य मानसशास्त्रीय उपचार या त्रासाला आटोक्यात आणण्यासाठी महत्त्वाचे आहेत.