नोकिया (Nokia) ने नवा फीचर फोन भारतात लाँच केला आहे. Nokia 105 (2019) असं या फीचर फोनचं नाव असून याची सर्वात मोठी खासियत म्हणजे यात अत्यंत दर्जेदार आणि दमदार बॅटरी देण्यात आली आहे. दमदार बॅटरीमुळे 25 दिवसांचा स्टँडबाय टाइम मिळेल असा कंपनीचा दावा आहे.

केवळ 1,199 रुपये इतकी या फीचर फोनची किंमत असून यामध्ये 1.77 इंचाचा कलर स्क्रीन डिस्प्ले आहे. नोकियाच्या या फोनमध्ये आइसलँड कीमॅट डायल पॅड, क्लासिक स्नेक गेम आणि कलर्ड पॉलीकार्बोनेट बॉडी आहे. स्नेक गेमशिवाय यामध्ये टेटरिस, स्काय गिफ्ट, एअरस्ट्राइक, निट्रो रेसिंग, निंजा अप! आणि डेंजर डॅश हे गेम प्रीलोडेड आहेत. यात 2,000 कॉन्टॅक्ट नंबर आणि 500 SMS सेव्ह करता येतील. याशिवाय Nokia 105 (2019)मध्ये 4GB इंटरनल स्टोरेज आहे.

हा फीचर फोन ब्ल्यू, पिंक आणि ब्लॅक या तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल. 20 ऑगस्टपासून या फोनच्या विक्रीला सुरूवात झाली आहे. नोकियाच्या ऑनलाइन स्टोअर्स आणि देशभरातील अव्वल रिटेल आउटलेट्समध्ये हा फोन विक्रीसाठी उपलब्ध आहे. यामध्ये 4MB रॅम आणि 4GB इंटरनल स्टोरेज आहे. यातील 800 mAh क्षमतेची बॅटरी 25 दिवसांचा स्टँडबाय टाइम आणि 14.4 तासांचा टॉकटाइम बॅकअप देईल असा दावा कंपनीने केला आहे. फोनमध्ये 3.5 mm चा ऑडियो जॅक असून हा फीचर फोन Series 30+ OS वर कार्यरत असेल. या फोनमध्ये FM रेडिओ आणि LED टॉर्चलाइट देखील आहे. 74.04 ग्रॅम वजनाच्या या फोनमध्ये कॅमेरा देण्यात आलेला नाही. यामध्ये या गेम्सचा समावेश आहे.