रिलायन्स जिओने बाजारात आल्यापासून इतर कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. त्यातच जिओने आपले मोबाईल बाजारात आणत ग्राहकांना आणखी एक सुखद धक्का दिला होता. जिओच्या नव्या फोनमध्ये व्हॉटसअॅप असल्याने या फोनची बरीच चर्चा झाली. कंपनीने या सुविधा दिल्याने ग्राहकांची या फोनला मोठ्या प्रमाणात पसंतीही मिळाली. त्यानंतर आता जिओने आणखी एक सरप्राइज दिले आहे. व्हॉटसअॅपनंतर आता कंपनीने YouTube अॅपची सुविधा दिली आहे. त्यामुळे तुम्हाला युट्यूबवर तुमच्या आवडीचे व्हिडियो पाहता येणार आहेत. तसेच गाणीही ऐकता येणार आहेत.

हे अॅप्लिकेशन ग्राहकांना १९ सप्टेंबरपासून उपलब्ध होईल. या जिओ फोनच्या अॅपस्टोअरवर तो डाऊनलोड करता येणार आहे. तुमच्याकडे सुरूवातीचा जिओ फोन किंवा आता लाँच झालेला जिओ फोन २ असेल तरीही तुम्ही यूट्यूब अॅप त्यात डाऊनलोड करू शकता. काही महिन्याआधी रिलायन्स जिओने अपग्रेटडेड वेरियंट असलेला जिओफोन २ लाँच केला होता. जिओ फोनमध्ये युट्यूब डाउनलोड करण्यासाठी, सर्वात आधी फोनच्या मेन्यू ऑप्शनमध्ये जा, यानंतर App Store सर्च करा. अॅपस्टोअरवर क्लिक करा, तेथे यूट्यूब सर्च करा. यानंतर त्याला डाऊनलोड करा. डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही मनासारखे व्हिडीओ पाहू शकता.